मीडियात झाकलं जातंय, पण मध्य प्रदेश आणि राजस्थान भाजपमध्ये उभी फूट पडल्याचं वृत्त, दिल्ली भाजपाही चिंतेत
Lok Sabha Election | लोकसभा निवडणुका ७-८ महिन्यांवर येऊन पोहोचल्या आहेत, तसेच नोव्हेंबर मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि त्रिपुरा राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला दिल्लीतील भाजप वरिष्ठांची चिंता प्रचंड वाढल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
राज्यातील मुद्यांवर भाजपाला पराभवाची भीती म्हणून….
पाच पैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ३ राज्यांमध्ये भाजपाला दारुण पराभव होण्याची भीती सतावत असल्याचं वृत्त आहे. तसेच या तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं स्थानिक पातळीवरील पक्ष संघटन अत्यंत मजबूत स्थितीत आहे. मोठा पराभव झाल्यास पुचे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही मोठा धक्का बसेल या भीतीने मोदी-शहा चिंतेत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणूक एकत्र होण्याची रणनीती भाजप आखात आहे. कारण मध्य प्रदेश आणि राजस्थान भाजपमध्ये उभी फूट पडली असून येथील परिस्थिती मोदी-शहा यांच्या हातातही नाही असं खात्रीलायक वृत्त आहे.
मात्र गोदी मीडियाला यावर भाष्य न करण्याचे आदेश असल्याचं म्हटलं जातंय. तर छत्तीसगड मध्ये भाजपाकडे स्थानिक चेहराच नसल्याने सर्वकाही ED भरोसे असून, काँग्रेसचे नेते स्वतःकडे खेचण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरु झाल्या आहेत. मात्र, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ED धाडीनंतर कॅबिनेटमंत्र्यांसोबत एकत्र पत्रकार परिषद घेऊन ED धाडीचा आणि अदाणींचं कनेक्शन उघड करून भाजपाला चितपट केल्याने ती देखील अशा मावळली आहे. तसेच त्याच निवडणुकीवेळी महाराष्ट्राच्या निवडणुका देखील घेतल्या जातील अशी खात्रीलायक बातमी.
भाजपची तयारीही वेगवान असल्याने नितीश आणि ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांनाही मुदतपूर्व निवडणुकीची शंका आधीच व्यक्त केली आहे. त्या लवकरच लोकसभेचा उमेदवार ठरविण्यास विरोधकांनी सुद्धा सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर ज्या प्रकारे एलपीजी गॅसच्या किंमतीत 200 रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सर्व योजनांचे उद्घाटन करत आहेत. त्यामुळे सध्या पराभवाच्या भीतीने ‘राजा’ घाबरल्याची देखील चर्चा आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खासदारांना संदेश देत आहेत की, त्यांनी जनतेत जाऊन सरकारच्या योजनांचा प्रचार करावा. गेल्या काही महिन्यांपासून भाजप निवडणुकीच्या मोडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे विरोधकांच्या भीतीत वाढ होत आहे.
मध्य प्रदेशात माजी मंत्र्यांच्या घरातील नेते मंडळी काँग्रेसमध्ये
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे तिकिटाची आशा सोडलेले भाजपचे अनेक नेते काँग्रेसपक्षात प्रवेश करत आहेत. दरम्यान, भाजपचे माजी मंत्री जुगल किशोर बागरी यांचे चिरंजीव देवराज, सून वंदना बागरी, निवारी जिल्हा पंचायत सदस्या रोशनी यादव यांच्यासह शिवपुरीतील भाजपच्या अनेक नेत्यांनी गुरुवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यापूर्वी अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नव्हे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातील भाजप लॉबी देखील खुलेआम भाजपाच्या दिल्लीश्वरांना धमकी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी डेडलाईन देतं आहेत. मध्य प्रदेशात RSS चा मोठा गट थेट मोदी-शहा यांच्या एकाधिकार शाहीविरोधात भाजप कार्यालयातच बैठक घेत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
राजस्थान भाजपमध्ये वादळ
भाजपची परिवर्तन यात्रा २ सप्टेंबरपासून राजस्थानमध्ये सुरू होणार आहे. पक्षाने वसुंधरा राजे यांना मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे वसुंधरा राजे नाराज असल्याची चर्चा आहे. अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा चारही दिशांनी परिवर्तन यात्रा सुरू करतील. विशेष म्हणजे यावेळी बदलाच्या प्रवासाचा चेहरा नाही. गेहलोत सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या विरोधात काढण्यात आलेल्या परिवर्तन यात्रेचा मुख्य चेहरा वसुंधरा राजे होत्या. यावेळी वसुंधरा राजे यांना डावलण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री शेखावत सांगत आहेत की, विधानसभा निवडणूक पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जाईल. त्यामुळे राजस्थानमध्ये गुजरात लॉबी विरोधात प्रचार सुरु झाला आहे.
राजस्थानमध्ये भाजपमध्ये दोन गट पडले
विधानसभा निवडणुकीपूर्वी वसुंधरा राजे मैदानात कमी सक्रिय आहेत. विशेष म्हणजे वसुंधरा राजे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपचा कोणताही ज्येष्ठ नेता करताना दिसत नाही. नुकतेच अमित शहा यांनी गंगापूर शहराला भेट दिली, मात्र वसुंधरा राजे समर्थकांनी या कार्यक्रमापासून अंतर ठेवले. अमित शहा यांनीही मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, वसुंधरा राजे गटाच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वसुंधरा राजे भाजप वरिष्ठांवर प्रचंड नाराज आहेत. वसुंधरा राजे दोनवेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष झाल्या आहेत. असे असूनही निवडणुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या नेत्यांना वसुंधरा राजे प्रोत्साहन देत आहेत आणि आज ते वसुंधरा राजेंना खुले आव्हान देत आहेत.
News Title : BJP divided in two groups in Madhya Pradesh and Rajasthan check details on 30 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News