12 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Eknath Shinde | फडणवीसांची धावपळ कायदेशीर बाबींवर? | शिंदेंची कायदेशीर धावपळ फडणवीसांच्या भरोसे?

Eknath Shinde

Eknath Shinde | महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो प्रयोग होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणून याकडे पाहिलं गेलं. या सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं बंडही चर्चेत आहे. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं होतं. ते खरं ठरवत कारण एकनाथ शिंदे हे पडद्यामागून उद्धव ठाकरेंविरोधात कामं करत होते याची फडणवीसांना माहिती होती.

शिंदे गटाचे आमदार मुंबईत आल्यानंतर गोंधळाची शक्यता :
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परवा त्यांच्या ‘सागर’ या निवासस्थानातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते गुजरातला एका गुप्त बैठकीसाठी जावून आल्याची चर्चा आहे. ही गुप्त बैठक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातच्या वडोदरा येथे झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यानंतर आता मुंबईत भाजपच्या गोटात आणखी घडामोडी घडत आहेत.

फडणवीस-शिंदेंची आणि अमित शाह भेट?
गेल्या 5 दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय खलबलांना पूर्णविराम लागत नसल्याचं दिसून येत आहे. एक पक्ष सत्ता स्थापनेसाठी तर दुसरा पक्ष सत्ता वाचविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे. त्यानंतर ते सागर बंगल्यावरून ३ तास कुठे गेली आणि पुन्हा परतले. मिळालेल्या वृत्तानुसार फडणवीस मुंबईतून शिंदे गटाला कायदेशीर बाबींवर मदत करत आहेत.

बंडखोर आमदारांपैकी एक आमदार औरंगाबादमध्ये येणार :
महाविकास आघाडी सरकारकडून बंडखोर आमदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तर आमदारांनी कोर्टात जाण्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान गुवाहाटीतून बंडखोर आमदारांच्या गोटातून एक आमदार औरंगाबादमध्ये दाखल होणार आहे. हे आमदार म्हणजे अब्दूल सत्तार.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde in communication with Devendra Fadnavis over rebel check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x