17 November 2019 9:54 PM
अँप डाउनलोड

मोदी आणि डोवल यांच्यावरील हल्ल्यासंबंधित गोपनीय माहिती; माध्यमांचे सूत्र इथेही? समाज माध्यमांवर चर्चा

NSA Ajit Doval, PM Narendra Modi, jaish e mohmmed

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यावर हल्ला करण्यासाठी विशेष गट तयार करण्याचं काम पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठीच हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयमधील एक ‘मेजर’ या हल्ल्यासाठी ‘जैश’ची मदत करत आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिली.

‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेतील पाकिस्तानी दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याचा म्होरक्या यांच्यातील लेखी संवादाची माहिती एका विदेशी गुप्तचर संस्थेच्या हाती लागली. त्याच विदेशी गुप्तचर संस्थेनं ही माहिती भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली. विदेशी संस्थेकडून मिळालेली माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या हाती लागली असून, सप्टेंबरमध्ये एका मोठ्या हल्ल्याची योजना आखल्याचा त्यात उल्लेख आहे.

दरम्यान, या गोपनीय माहितीच्या आधारावर जम्मू, अमृतसर, पठाणकोट, जयपूर, गांधीनगर, कानपूर आणि लखनौसह एकूण 30 अत्यंत संवेदनशील शहरांमध्ये पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबरोबरच अजित डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेचीही तपासणी करण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ते दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या एकेका दहशतवाद्याला शोधून शोधून टिपले आहे. त्यामुळे त्याचा खवळलेला जैशचा म्होरक्या आपल्या दहशतवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आसुसला आहे. दरम्यान, 5 ऑगस्टनंतर नियंत्रण रेषेवरून आत्मघाती दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र या घुसखोरीचे अनेक प्रयत्न सीमेवर सतर्क असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडले आहेत.

दरम्यान, यावरून समाज माध्यमांवर वेगळीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीवर होणाऱ्या हल्ल्यासंबंधित गोपनीय माहिती इतक्या सहज कशी काय प्रसार माध्यमांच्या सूत्रांना दिली जाते आणि त्यामागील नेमका उद्देश काय असतो असा प्रतिप्रश्न समाज माध्यमांवरील चर्चेत उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसेच देशात कोणत्याही महत्वाच्या निवडणुका लागल्या की अशा बातम्यांचा सपाटाच लागतो असे खोचक प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1038)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या