महत्वाच्या बातम्या
-
गुगलने मला दोनवेळा नाकारल्यानेच फ्लिपकार्ट वेबसाइट उभी राहिली: बिनी बंसल
मी दोनवेळा गुगलला नोकरीसाठी माझा बायोडेटा पाठवला होता, परंतु दोन्ही वेळी मला गुगलने नाकारल होत आणि त्यामुळेच फ्लिपकार्ट वेबसाइट सुरु करू शकलो असं फ्लिपकार्ट’चे संस्थापक बिनी बंसल यांनी बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं.
7 वर्षांपूर्वी -
आता ट्रॅफिक पोलिसांना गाडीची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही
केंद्रीय परिवाहन मंत्रालयाच्या अध्यादेशानुसार डिजिलॉकर किंवा एम- परिवाहन या अॅपवर तुमच्या वाहनांची मूळ कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची ट्रॅफिक पोलिसांच्या नियमातून सुटका होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्स आणि निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी
शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे आणि बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. आज मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदा ३८,००० अंशांचा टप्पा ओलांडला.
7 वर्षांपूर्वी -
मीरारोडचे रहिवासी मेजर कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर शोकाकुल, पण भाजप नेते पार्टीत दंग
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना ३ भारतीय जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली असताना मीरारोडचे स्थानिक भाजप नेते पार्टीत दंग झाले आहेत. भाजपचे स्थानिक नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा वाढदिवस स्थानिक नेतेमंडळी तसेच आमदारांनी एकदम धुमधडाक्यात साजरा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
'एक देश, एक निवडणूक' अशक्य: मुख्य निवडणूक आयुक्त
काही महिन्यापासून वन नेशन वन ईलेक्शन’वर चर्चा रंगली असताना स्वतः मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसे करायचे झाल्यास आधी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल तसेच ईव्हीएम’च्या दुप्पट म्हणजे तब्बल ४५ लाख मतदान यंत्र लागतील असं सांगत ‘एक देश, एक निवडणूक’ शक्य नसल्याचं कारण दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईचे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण
उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्नं करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या ४ जवानांना वीरमरण आले आहे. शहिद झालेल्या जवानांमध्ये मुंबईचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे शहीद झाले आहेत. वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके'चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं निधन
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके’चे सर्वेसेवा करुणानिधी यांचं आज चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झालं. रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी अधिकृत पत्रक काढून प्रसार माध्यमांना तशी माहिती दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
देशात तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम बंदी?
देशात जर कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाच तर थेट फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडियांवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. कारण तणावाच्या काळात अफवांचा सुळसुळाट वाढतो आणि अशावेळी परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून केंद्र सरकार यावर गंभीरपणे विचार करत आहे.
7 वर्षांपूर्वी -
इंद्रा नुयी 'पेप्सिको'च्या सीईओ'पदाचा राजीनामा देणार
तब्बल बारा वर्षांच्या सेवेनंतर पेप्सिको’च्या सीईओ इंद्रा नुयी पदाचा राजीनामा देणार आहेत. त्या ३ ऑक्टोबर रोजीी पदावरुन पायउतार होतील असं समजतं, परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे बिझनेस वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही बँकेत किमान रक्कम न ठेवल्याने बँका मात्र मालामाल
तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नसेल कदाचित, परंतु त्यामुळे ग्राहकाला जरी दंड बसला असेल तरी बँकांची मात्र तुफान चांदी झाल्याचे समजते. कारण किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५,००० कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कडवी झुंज; परंतु पी व्ही सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले
चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले आहे. त्याआधी स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिनेच भारताच्याच सायना नेहवाल हिला पराभूत केले होते. परंतु पी व्ही सिंधूने सुद्धा कडवी झुंज दिली होती.
7 वर्षांपूर्वी -
अहो नोकर्याच नाहीत, तर आरक्षणाचे करणार काय ? नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आरक्षणावर त्यांची रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली असता, त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘डी’कोल्ड व सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर लवकरच बंदी?
‘डी’कोल्ड आणि सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेदनाशामक तसेच फ्लू’शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ही औषधे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘आज की बड़ी खबर' मोदींचा VIDEO: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी'ला मोदी 'मेहुल भाई' बोलले होते
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘‘आज की बड़ी खबर” असं ट्विट करून २०१५ मधील एक विडिओ प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमात १३,००० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी’ला ‘मेहुल भाई’ बोलले होते असा तो विडिओ आहे.
7 वर्षांपूर्वी -
तुमच्या अँड्रॉईड मोबाईल'मधील तो ‘UIDAI’चा नंबर येणे ही गुगलची चूक
भारतातील करोडो अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल अचानक ऑटोमेटेड पद्धतीने ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक सेव झाला होता. त्यामुळे वायरस किंवा मोबाईल हॅक सारख्या अफवा पसरल्या होत्या. तसेच अनेकांनी त्यासाठी UIDAI’ खात्याला जवाबदार धरले होते, ज्यावर नंतर ‘आधार’ कडून अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेत सामील असणाऱ्या शिवसेनेचा 'बेळगाव प्रश्नी' महाराष्ट्र सरकारला प्रश्न
कर्नाटकच्या कुमारस्वामी मंत्रिमंडळाने बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा आणि कर्नाटक सरकारची आस्थापने बेळगावला वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. कर्नाटक सरकारच्या या हालचालींमुळे सीमाभागात रोष व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेणार ते महत्वाचं ठरणार आहे. परंतु शिवसेनेच मुखपत्र असणाऱ्या सामना’मधून बेळगाव प्रश्नी महाराष्ट्र सरकारला प्रश्न करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना वाटलेल्या टॅबलेटमध्ये प्रिलोडेड अश्लील फोटो: ANI
छत्तीसगडमधील शहरांबरोबरच ग्रामीण भागातील सरकारी शाळांना केंद्र सरकारने वाटलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो प्रिलोडेड असल्याच उघड झालं आहे. केंद्र सरकारकडून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची व शिक्षकांच्या हजेरीचा तसेच दैनंदिन कामाचा तपशील ठेवण्याच्या उद्देशाने हे टॅबलेट वाटण्यात आले होते. परंतु त्यातील ही धक्कादायक गोष्ट उघड झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा, महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार?
कर्नाटकच्या कुमारस्वामी मंत्रिमंडळाने बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा आणि कर्नाटक सरकारची आस्थापने बेळगावला वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. कर्नाटक सरकारच्या या हालचालींमुळे सीमाभागात रोष व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेणार ते महत्वाचं ठरणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलची सुविधा राजकारण्यांसाठी निवडणुकीत 'डिजिटल चावडी सभा' होण्याची शक्यता?
आजच व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे व्हॉइस व व्हिडीओ कॉल या दोन्ही पर्यायांमध्ये या ग्रुप कॉलची सुविधा देण्यात आली आहे. परंतु त्यात एकाच वेळी कमाल ४ जणांना एकाचवेळी एकमेकांशी संवाद साधता येईल. अँड्रॉइड तसेच आयओएस या दोन्ही प्रणालींवर ही नवी सुविधा उपलब्ध असेल असं कंपनीने म्हंटल आहे. जगभरातील जवळपास दीड अब्ज युजर्स या ग्रुप कॉलिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON