18 August 2019 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अर्थमंत्र्यांची पत्नी विश्वस्त पदी; तिरुपती देवस्थानला २०० कोटींचा भूखंड १ रुपया दराने; सरकारचा पराक्रम काश्मीरबाबत पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु; सैन्य दलाचे अधिकारीही उपस्थित मी तिथे होती, दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीवेळी कन्हैय्या कुमार तेथे नव्हता: भाजप खासदाराची पत्नी सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण...... बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू ‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
x

विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण

विधानसभेपूर्वी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी फडणवीसांकडून फोन: अशोक चव्हाण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याच्या ऑफर्स देत आहेत असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे सतत आमच्या आमदारांना फोन करत आहेत. त्यासोबतच भाजप मधले काही नेते देखील काँग्रेसच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर असून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा पक्ष प्रवेश काही दिवसांसाठी लांबवला आहे. त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील ह्यांनी काँग्रेस सोडून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते खासदार देखील झाले. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या सोबत काँग्रेसचे काही आमदार घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात चालणारा घोडेबाजार हा काही आपल्यासाठी नवा नाही. निवडणुका आल्या कि राजकारण्यांच्या माकडउड्या सुरु होतात. प्रत्येक राजकीय पक्षाला काही नैतिक मूल्यांचा आधार असतो परंतु पक्ष परिवर्तन केल्यानंतर आपण ज्या राजकीय पक्षांच्या मूल्यांवर टीका केली होती ते साफ विसरून नवीन नैतिक मूल्ये ते आत्मसाद करतात.

इथे लग्न जमते - मराठी विवाह

हॅशटॅग्स

#Congress(243)#Devendra Fadnavis(263)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या