महत्वाच्या बातम्या
-
अनंत गीतेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून महाविकास आघाडीत 'राजकीय तेल' ओतणारी प्रतिक्रिया
शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Ramdas Kadam Vs Vaibhav Khedekar | कोणत्याही परिस्थितीत वैभव खेडेकरांवर मानहानीचा दावा करणार - रामदास कदम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गेल्या १० वर्षात सोमय्यांचं थोबाड पाहिलं नाही | मी कशाला सरकार पाडू? - रामदास कदम
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधातील दारुगोळा शिवसेना नेते रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरविल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. खेडेकर यांच्या या आरोपांवर रामदास कदम यांनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. खेडेकर यांचे आरोप बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं सांगतानाच गेल्या दहा वर्षात मी सोमय्यांचं थोबाडच पाहिलं नसल्याचा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनंत गीतेंचे राष्ट्रवादी संदर्भातील 'ते' वक्तव्य वैफल्याग्रस्तातून | सुनील तटकरेंचे प्रत्यूत्तर
काल शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्याग्रस्तातून अनंत गीते यांचे वक्तव्या आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेचा स्वाभिमान मागच्या निवडणूनक गळून पडला असून नैराशेतून त्यांचे हे वक्तव्य आले असल्याचेही तटकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
NCRB रिपोर्ट | महिला अत्याचारात भाजपशासित राज्य देशात टॉप 3 मध्ये | तर राज्यपालांचे ठाकरे सरकारला विशेष अधिवेशनसाठी पत्र
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे. इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेची दखल घेणं, त्यात अधिवेशन बोलावण्याच्या सूचना करणं हे म्हणजे राज्याच्या सक्रीय राजकारणात वाढत्या हस्तक्षेपाचं द्योतक आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या तोंडास फेस | शिवसेनेचं टीकास्त्र
महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि विरोधी पक्ष भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात सध्या चांगलीच खडाजंगी सुरू आहे. सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी आरोप केले आहेत. आता शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून याविषयावर भाष्य केले आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिजित लिमयेला सोडविण्यासाठी फडणवीसांनी कॉल केला | लखोबा लोखंडेचं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का? - रुपाली चाकणकर
लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले होते.
4 वर्षांपूर्वी -
ED कुणाला अटक करणार हे यांना कसे माहीत पडते? | CBI-ED'च्या कामाला काही दर्जा आहे की नाही? - सुप्रिया सुळे
मी खासदार झाले तरी मला ईडी आणि सीबीआयचे प्रमुख माहीत नव्हते. आज रस्त्यावर चलन काटणाऱ्या प्रमाणे ईडीची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच सीबीआय आणि ईडीच्या कामाला काही दर्जा आहे की नाही?, असा सवालही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Kirit Somaiya Vs Ajit Pawar | ते रोज काही तरी आरोप करणार, त्यावर रोज काय बोलणार - अजित पवार
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळपासून ठाकरे सरकारच्या नेते-मंत्र्यांच्याविरोधात आरोपांचा धडाका लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अलिबागमधील 19 बंगल्याची आणि अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पाहणी करणार अ्सल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Bigg Boss Marathi 3 | उत्सुकता संपली, जाणून घ्या स्पर्धकांची नावं | इंटरटेन्मेंट अनलॉक
२१ जून रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती की हा सिझन कधी सुरू होणार व त्यातील स्पर्धक कोण असणार आहेत. काल १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांची उत्सुकता संपली. बिग बॉस ३ चा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला. यामध्ये अधिकृतरीत्या पंधरा स्पर्धकांची नावे आपल्या समोर आली. ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेत वकिलाचे पात्र साकारणाऱ्या सोनाली पाटीलचा बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात आधी प्रवेश झाला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार | तशी वेळच आता आली आहे - नाना पटोले
काँग्रेस पक्षातील दोन मंत्र्यांचे घोटाळे लवकरच आपण बाहेर काढणार आहोत असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्याला “कर नाही, त्याला डर कशाला” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्थमंत्री अजितदादांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा | केंद्राकडून GST मिळणा, यातून भार हलका होईल - रुपाली चाकणकर
देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना केलं. त्यानंतर चाकणकरांनी चंद्रकातदादांचा समाचार घेताना त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ED, CBI'ने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का? | तक्रारी करा, पण चौकशी सुद्धा भाजपाच करणार का? - सचिन सावंत
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार आहे. तसे सुतोवाचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे भाजपच्या रडारवरील हे दोन नेते कोण? असा सवाल केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
2 दिवसात माजी चे आजी मंत्री होणार या चंद्रकांत पाटलांच्या भविष्यवाणीचे काय झाले? | दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात? - सचिन सावंत
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते.
4 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस दबंग नेता | 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून गुपचूप आलेल्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता असून ते शंभर अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य त्यांनी केले. पुण्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात सोमय्यांचे आरोप हे भाजपचं षडयंत्र आहे. या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत. मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे, असं सांगत ‘मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील होती’, असा गौप्यस्फोट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
4 वर्षांपूर्वी -
भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न
महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात बनावट पद्धतीने खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये अवैधरीत्या वळवले. याच पैशांचा वापर जमीन खरेदीसाठी झाल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्या आता रश्मी ठाकरेंना लक्ष करताना त्यांच्या मालमत्तेवरून अलिबाग 'आरोप पर्यटन दौरा' करणार
महाविकास आघाडी सरकारमधील अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोमैयांची आरोप पर्यटन यात्रा | मागील ३ दिवसांत ४ दौरे | सत्तेत असताना मुलुंडमध्येच असायचे व्यस्त
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER