18 April 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

पोलीस कॉन्स्टेबलला १० दिवसांनी इस्पितळातून डिस्चार्ज; घरी अवघ्या ४ तासांनी मृत्यू

Mumbai Police, Maharashtra Police, Covid 19

मुंबई, ३० मे: महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. उर्वरीत जे १५-१६ टक्के जे रुग्ण आहेत त्यांना मध्यम प्रकारात मोडणारी लक्षणं दिसत आहेत. सध्याचा आपला रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४३ टक्के इतकं आहे. तर मृत्यूदर हा ३.३ टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याच्याबाबतीत एक धक्कादायक गोष्ट घडली आहे आणि त्यामुळे बरे झालेल्या पेशंटचा आकडा वाढवण्यासाठी सरकारकडून घाई तर केली जात नसावी ना अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. कारण वरळीतील कोरोनाग्रस्त पोलीस कॉन्स्टेबलला १० दिवसांनी कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज दिल्याच्या अवघ्या ४ तासांनीच या कॉन्सेटबलचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

वरळीतील पोलीस वसाहतीत राहणारे कॉन्स्टेबल दीपक हाटे (५२) हे वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १८ मे रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया इथल्या कोविड सेंटरमध्ये ठेवले होते. १० दिवसांनी गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यावर हाटे यांना आपल्या वरळी पोलीस कॅम्प येथील राहत्या घरी सोडण्यात आलं. मात्र यावेळी हाटे यांना चालण्यास देखील त्रास होत होता. गाडीने त्यांना घरापासून १ किमी अंतरावर सोडण्यात आलं व तेथून ते चालत घरी आले असल्याची माहिती इथल्या अष्टविनायक क्रीडा मंडळचे प्रमुख विश्वास आव्हाड यांनी दिली.

दीपक हाटे घरी परतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय व आसपासच्या रहिवाश्यांनी त्यांचं आनंदाने स्वागत केलं. त्यानंतर रात्री १ वाजण्याच्या सुमारास हाटे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तासाभरातच हाटे यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. दरम्यान, कोरोना रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं कोविड सेंटरच्या डॉक्टर नीता वारती म्हणाल्या.

 

News English Summary: The covid 19 police constable was discharged from Covid 19 Center after 10 days. However, the death of the constable just four hours after his discharge has caused a stir in the police administration.

News English Title: Mumbi Police constable died in few hours after being discharged from Covid care 19 Center News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x