महत्वाच्या बातम्या
-
भाजपने आता तेलंगणावर लक्ष वळवले
दक्षिणेत पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेला अपयश आल्याने आता भाजपने आता दक्षिणेतील दुसरं राज्य तेलंगणावर लक्ष केंद्रित केलं आहे. तेलंगणा विधानसभेत एकूण १२० जागा असून सध्या भाजपचं तेथे एकूण संख्याबळ केवळ ५ आमदार इतकंच आहे. परंतु तेलंगणात परिस्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गुजरात मॉडेल अंमलात आणण्याचा विचार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुढची ५ वर्षे आपणच मुख्यमंत्री: कुमारस्वामी
मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याबाबत काँग्रेस बरोबर कोणताही समझोता झाला नसून संपूर्ण कार्यकाळ आपणच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचे कुमारस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केला आहे. काही दिवस मुख्यमंत्री पदाबाबत ३०-३० महिने हे पद वाटून घेण्याचा दोन्ही पक्षात समझोता झाल्याच्या बातम्या येत असल्याने कुमारस्वामीना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
तर शिवसेनेच्या भविष्यात अडचणी वाढतील
२०१९ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना डॉ. मनमोहन सिंग हेच टक्कर देऊ शकतात. कारण राहुल गांधी यांना अजून बरंच राजकीय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे राहुल गांधी गांधी हे मोदींना टक्कर देऊ शकणार नाहीत असं परखड मत व्यक्त केलं आहे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी. तर दुसरीकडे शिवसेनेने जर निर्णय वेळीच घेतला नाही तर त्यांच्यासमोर भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर सेनेचे आमदार-खासदार फुटण्याची शक्यता
शिवसेनेने २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जर भाजपसोबत युती केली नाही तर शिवसेना पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार बाहेर पडतील असं मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. या विधानाने शिवसेना आणि रामदास आठवले यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची घाई करायला नको होती - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी येडियुरप्पा यांच्या अडीच दिवसाच्या कार्यकाळावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या माते भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती, उलटअर्थी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सय्यम ठेवला होता.
7 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा!
अडीच दिवसाचे मुख्यमंत्री राहून त्यांनी अखेर राजीनामा दिला आणि या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर पडदा पाडला आणि काँग्रेस – जेडीएसला सत्ता स्थापनेचे आव्हान केले. तरीही जर कर्नाटकात मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर भाजप संपूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणेल हा विश्वास व्यक्त केला.
7 वर्षांपूर्वी -
...तर १०० पटीने श्रीमंत व्हाल आणि मंत्रिपद सुद्धा मिळेल - ऑडिओ क्लिप
आम्हाला सांगा तुम्हाला कुठला पद हवं आहे? आपण समोर-समोर बसून बोलू आणि ठरवू. जर तुम्ही ऑफर स्वीकारली तर तुम्ही मंत्री बानू शकता आणि मोठ्या लोकांबरोबर तुमची उठबस होऊ शकते.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा १ तर काँग्रेस-जेडीएसचे ४ आमदार गायब ?
कर्नाटकात भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तासच उरले असताना १ नवीनच धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे ४ आमदार तर भाजपचा १ आमदार चक्क गायब झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
...नाहीतर बुलडोझरखाली चिरडेन! गडकरींचा कंत्राटदारांना दम
गरिबांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये असं त्यांच नेहमी प्रामाणिक मत असतं, आणि देशातील पैसा हा कंत्रादारांचा नसून तो सामान्य गोरगरिबांचा आहे हे विधान करायला ते विसरले नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बुलेट-ट्रेनच्या विरोधात ?
सध्या पालघर जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीची लगबग असून त्याचाच मेळ साधून शिवसेनेने बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे. पालघर पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधी कृती समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच शिवसेना या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सूचित केले आहे. बुलेट ट्रेनला विरोध असण्यापेक्षा या मागील खरं कारण लोकसभा पोटनिवडणुक असल्याचं राजकीय विश्लेषक बोलत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपला दणका, 'ती' अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती अवैध
कर्नाटकात भाजपला उद्या बहुमत सुद्धा करायचे असताना त्यांना सर्वोच न्यायालयाने अजून एक दणका दिला आहे. राज्यपालांनी केलेली अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती अवैध असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपला हा एकाच दिवशी मिळालेला दुसरा दणका असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा भाजपला झटका, बहुमत उद्याच सिद्ध करा
आज सकाळ पासूनच सर्वोच न्यायालयात कर्नाटकातील सत्तास्थापनेवरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. त्यात चर्चेअंती सर्वोच न्यायालयाने उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळी ४ वाजता बहुमत सिद्ध करावे असे थेट आदेश भाजपला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सहकार मंत्र्यांच्या कंपनीवर सेबीची कारवाई
भाजपचे आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो लिमिटेड या कंपनीवर ‘सेबी’ने टाच आणली आहे. सहकार मंत्री आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांच्यासह इतर तब्बल १० संचालकांवर ‘सेबी’ने भांडवली बाजारात व्यवहार करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख अडचणीत येण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
सोलापूर महापालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपचं मिलन
सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आप व शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच 'डिपॉझिट' जप्त
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष तर काँग्रेस आणि जेडीएस हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. परंतु बाकी सर्व पक्ष म्हणजे आप आणि शिवसेनेच्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
7 वर्षांपूर्वी -
'राम' काँग्रेस-जेडीएस'साठी धावून आले, गेम चेंजर कायदेतज्ञ
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील सत्तास्थापनेतील पेच काल सर्वोच न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. कर्नाटकात भाजपाला कायद्याच्या कचाट्यात कसं पकडायचं हेच एक शस्त्र सध्यातरी काँग्रेस-जेडीएस कडे असलं तरी त्यातही वेळे अभावी अनेक अडचणी होत्या. परंतु त्यात देशातील सर्वात यशस्वी वकीलाने स्वतःच भाजप विरोधात थेट आव्हान देण्यासाठी उतरले आहेत. त्यामुळे काँग्रेस-जेडीएस’च्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिशिर शिंदे शिवसेनेत जाणार, पण मनसेला फायदा की सेनेला नुकसान ? सविस्तर
मनसेचे भांडुप विधानसभा मतदार संघातील माजी आमदार शिशिर शिंदे हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त आहे. तस असलं तरी त्याने मनसेला काही फरक पडणार नसल्याचे एकूणच चित्र आहे असं दिसतं. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिशिर शिंदे यांच्या विरुद्ध पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल हरकती नोंदविल्या होत्या.
7 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पांचा शपथविधी झाला, काँग्रेसचे ४ आमदार 'गेले कुठे' ?
येडियुरप्पांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर त्यांना 15 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करावं लागणार. परंतु त्यांचा शपथविधी झाला असला तरी काँग्रेसचे ४ आमदार हे नॉट रिचेबल झाले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी झाली. काल संपूर्ण दिवस आणि रात्री उशिरापर्यंत सरकार स्थापनेवरून नाट्यमय घडामोडी घडत होत्या.
7 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद २४ तासात जाऊ शकत जर ?
येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी परंतु येत्या २४ तासात त्यांना सर्वोच्च न्यायालयात बहुमताचा आकडा सिद्ध करता आला नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागणार आहे. त्यामुळे अल्पमतात असताना येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER