महत्वाच्या बातम्या
-
तत्कालीन फडणवीस सरकार | भाजप नेत्यावर बलात्काराचा आरोप होतो | पण भाजपमध्ये शांतता असते
भाजपचे नेते आणि मुंबई म्हाडाचे तत्कालीन अध्यक्ष मधू चव्हाण यांच्या विरोधात सप्टेंबर २०१८ मध्ये चिपळूण पोलिस ठाण्यात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. चिपळूण येथील ५७ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. त्याचवेळी दिवसांपूर्वी मुंबईतही चव्हाण यांच्यावर असाच गुन्हा दाखल झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील एका शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या या महिलेने यापूर्वीही दोन वेळा मधू चव्हाण यांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
गोल्ड फिंच हॉटेलमध्ये मुंबई भाजप नेते | महाविकास आघाडीसंदर्भातील राजकीय पुड्यांवर चर्चा
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशा राजकीय पुड्या सोडण्याचे प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहेत. मात्र वास्तव वेगळं असल्याने भाजपातील पदाधिकाऱ्यांना पक्षातच थोपवायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र भाजपातील नेत्यांसमोर उभा आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीकडून लोटसचं ऑपरेशन सुरु असल्याने भाजप नेत्यांकडून पुन्हा पुड्या - सविस्तर वृत्त
आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रासप'ची भाजपच्या वीजबिल आंदोलनातून माघार | यापुढे भाजपापासून अंतर
राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांची भारतीय जनता पक्षावरील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. त्याचाच भाग म्हणून जानकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या वीजबिल आंदोलनातून माघार घेतली आहे. किती दिवस भारतीय जनता पक्षाच्या पाठीवर बसून जायचे? आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे, असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भारतीय जनता पक्षापासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अण्णा हजारेंकडून आंदोलनाचा इशारा | भाजप नेत्यांकडून मनधरणी सुरु
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
बलात्काराचे आरोप करून मग तक्रार मागे | रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी
कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल (दि.२१) लेखी निवेदन दिलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तांडव'ने भावना दुखावलेल्यांना मानसोपचाराची आवश्यकता | एवढी भिकार सीरिज बनवून वेळ वाया...
तांडव वेबसिरीज प्रकरणी भाजपसह अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या वेबसिरीजमध्ये हिंदूंचा देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपने याविरोधात थेट आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये सर्वाधिक पुढे होते ते जागतिक ख्यातीचे आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी घाटकोपरमधील बंगाली लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेणारे भाजपचे आमदार राम कदम हे सर्वानी पाहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | भाजपचे 19 नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत | भाजपकडून खंडन
पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं होतं. भारतीय जनता पक्षाचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मोठी इनकमिंग भारतीय जनता पक्षात झाली होती. परंतु यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप दिग्गजांना धक्के | विखे-पाटील, चंद्रकांतदादा, राणे यांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Gram Panchayat Result | दक्षिण सोलापुरात भाजपचा सुपडा साफ | काँग्रेसची बाजी
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. १५ जानेवारी रोजी राज्यातील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले. आज सकाळपासून या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची लोकप्रियता खुपत असल्यानेच आकसबुद्धीने निर्णय घेतला - पडळकर
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा मुंबई पोलिसांनी अहवाल दिल्यानंतरसुद्धा ही त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांसोबतच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती | भाजपकडून जवाबदारीचं वाटप
मुंबई महानगरपालिका निवडणुकी जवळ आली असताना महाविकासआघाडी सरकारमधील पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांची नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे.
4 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्या ईडीचे अघोषित प्रवक्ते? भविष्यातील कारवाईचे संकेत देण्याचा सपाटा
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत काल ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना ईडीकडून 5 जानेवारीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, वर्षा राऊत एक दिवस अगोदर ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. वर्षा राऊत यांना पीएमसी बँक प्रकरणी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत | ही त्यांची भाषा नाही | मग अग्रलेखात ती कशी?
सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले .
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | वसंत गीतेंची मिसळ पे चर्चा | राष्ट्रवादी-शिवसेना की पुन्हा मनसे?
इतर पक्षातील नेते भाजपात येत नसल्याने माजी आमदार बाळासाहेब यांना पुन्हा पक्षात घेऊन भाजपने आमच्याकडे भरती होतं आहे असा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय पत संपलेले बाळासाहेब सानप कोणत्याही पक्षाला नकोसे होते आणि अखेर अपरिहार्यता म्हणून पुन्हा तिकीट नाकारलेल्या भाजपमध्ये सामील झाले. विशेष म्हणजे भाजपने देखील एखादा माजी मुख्यमंत्री भाजपात येतोय असा प्रचार सुरु केला. मात्र सानप यांच्या येण्याने भाजपाला अजून पणवती लागली आहे. कारण नाराज नेते भाजप सोडू लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन सुरूच | भाजपचे ३ नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर
मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, माजी तसेच विद्यमान आमदारांनी भाजपाला रामराम करत महाविकास आघाडीतील पक्षात जाण्याचा सपाटा लावला आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर भाजपाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
कोणाला कोणत्या महिन्यात किती वेळा ED'च्या नोटीस गेल्याची माहिती भाजप नेत्यांकडे कशी?
शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भाजपाला मोठं खिंडार पडणार | शिवसेना धक्का देण्याचा तयारीत
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदा होऊ शकत असल्याने भारतीय जनता पक्षानेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आणि त्यांना प्रवेश दिला. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भारतीय जनता पक्षामधील या गटाकडून विचारला जात आहे. पण सानपांच्या पक्षप्रवेशानंतर आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक नाराज नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ | शापूरजी पालनजीकडून भाजपला निवडणूक फंडिंग | म्हणून कांजूरमार्ग प्लॉटवर?..
कांजूरमार्ग येथील जमीन जर केंद्र सरकारच्या मालकीची असेल तर मग फडणवीस सरकारने या जागेवर एक लाख घरे बांधण्याचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिक फर्मचा प्रस्ताव कसा स्वीकारला होता, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता गेली घोटाळे उघड | नगर बँक अपहारप्रकरणी भाजपच्या माजी खासदारावर गुन्हा दाखल
नगर अर्बन बँकेत तीन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार दिलीप गांधी, घनश्याम अच्युत बल्लाळ, आशुतोष सतिष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा पैशांचा अपहार ७ ऑक्टोबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०१७ यादरम्यान झाला आहे. याप्रकरणी आज बँकेचे अधिकारी मारुती औटी यांनी तक्रार दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER