महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाचा कहर, १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राजभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, पण त्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. खुद्द अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे समजते आहे. दरम्यान, अभिनेत्री जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची रॅपिड अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त
महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले, तर २२३ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले आहेत, तर २२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २,४६,६०० एवढा आहे. यातले ९९,२०२ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर १,३६९८५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५५.५५ टक्के एवढं झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबईत कोरोनाबाबत सर्वात चांगली कामगिरी असणाऱ्या वांद्रे पूर्व-खार येथील एच ईस्ट वॉर्डच्या ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. एच ईस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार ( वय 57 वर्ष) यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशोक खैरनार यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला त्यांच्यावर वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
5 वर्षांपूर्वी -
३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? - गिरीश बापट
पुण्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहून शहरात आणि पिंपरीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र भाजपा खासदार गिरीश बापट यांच्याकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. “मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा; पण ३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू, पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या असं म्हणत बापट यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप आणि व्यापारी महासंघाचा पुण्यातील लॉकडाउनला तीव्र विरोध
पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबाबत काय करता येईल, याबाबत पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. आता पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील टॉसिलिझीम ४०० एमजी इंजेक्शनचा काळा बाजार
राज्य सरकारने आदेश देवून 24 तासही उलटले नाही तोच पोलीस दलाने आपले कौशल्य दाखवत टॉसिलिझीम 400 एमजी इंजेक्शनच्या काळा बाजारावर धडक कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंताजनक! गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन कोरोना रुग्ण वाढले
देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबण्याचं नाव घेत नाही. रिकव्हरी रेट चांगला असेल तरी दिवसेंदिवस कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच आलेल्या माहितीनुसार 24 तासांत तब्बल 27 हजार 114 नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाख 20 हजार पार गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,३८,४६१ एवढी झाली आहे. कोरोनाच्या या एकूण रुग्णांपैकी ९५,६४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १,३२,६२५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ५,३६६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबातील तब्बल ७ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव थांबेना, ठाण्यातही लॉकडाऊन वाढवला
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव, २४ तासांत २६,५०६ नवे रुग्ण
देशात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढताना दिसत आहे. भारत आता कोरोनामुळे मृतांच्या यादीत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ भारताला तिसऱ्या स्थानावर घेऊन गेली आहे. मागील २४ तासांत देशात २६ हजार ५०६ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
निगेटीव्ह रुग्णावर कोरोनाचे उपचार, ३ लाख फक्त महागड्या इंजेक्शनवर खर्च
कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ६ हजार ७८५ नवे कोरोना रुग्ण, तर २१९ रुग्णांचा मृत्यू
कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवात कोकणात जाताय? पण जिल्हाधिकाऱ्यांकडून बंधनं
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. करोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विरोध झुगारून अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ६ हजार ६०३ नवे कोरोना रुग्ण, १९८ रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, १९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू
कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असं या नगरसेवकांचं नाव आहे. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER