महत्वाच्या बातम्या
-
७० वर्षांत अर्थव्यवस्था सर्वात वाईट स्थितीत; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची कबुली
भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली आहे. गेल्या ७० वर्षात सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट झाली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाल्याचं आता नीती आयोगाने मान्य केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चागंलाच धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारी कंपनी एअर इंडियाकडे इंधन पुरवठादारांची आधीची देणी देण्यास पैसे नाहीत
आधीची देणी न चुकविल्याने पुण्यासहित सहा विमानतळांवरएअर इंडियाच्या विमानांना इंधन पुरवठा करणे तेल कंपन्यांनी बंद केले आहे. मात्र त्यामुळे एअर इंडियाच्या सेवेवर त्याचा अद्याप फारसा परिणाम झालेला नाही. कोची, पुणे, पाटणा, रांची, विशाखापट्टणम आणि मोहाली या विमानतळांवरून एअर इंडियाल होणारा इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मोदी'जी पार्ले'जी' सुद्धा संकटात! १० हजार कर्मचाऱ्यांची कपात होणार
रिटेलसह वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा फटका कामगारांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, आता बिस्कीटांचं उत्पादन घेणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा सामना करावा लागत आहे. मागणी घटल्यानं आगामी काळात ८ ते १० हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. पारले जी कंपनीत सध्या एक लाख कामगार काम करतात.
6 वर्षांपूर्वी -
हुकुमशाहीला बळ देत खोट्या राष्ट्रवादाला खतपाणी: 'द हिंदू ग्रृप'चे संचालक एन.राम
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारला राफेल करारावरून सळो की पळो करून सोडणारे ‘द हिंदू ग्रृप’चे संचालक एन.राम यांनी पुन्हा लक्ष केलं आहे. मागील काही दिवसांपासून धार्मिक मुद्यांनी पुन्हा डोकं वर काढलं असून सरकारवर पुन्हा टीका होण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात विरोधकांनी आधीच मोदी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप केला असताना वरिष्ठ पत्रकार देखील त्यात सूर मिसळत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गझनीनंतर जर कोणी सर्वाधिक मंदिरं तोडली असतील तर ती मोदींनी: पत्रकार आतिश तासिर
देशभर मागील ५ वर्षांपासून मोदी सरकार सत्तेत आल्यावर विरोधकांनी अयोध्येतील राम मंदिरावरून सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. त्यात मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नही बताएंगे अशी टीका विरोधकांनी सातत्याने केली आहे. मागील अनेक दशकांपासून अयोध्येतील विवादित जमिनीसंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. २०१४ पासूनच्या जाहीरनाम्यात देखील राम मंदिर हा प्रमुख मुद्दा राहिला आहे आणि हिंदुत्व त्यातील प्रमुख आकर्षण असं म्हणता येईल.
6 वर्षांपूर्वी -
‘मेक इन इंडिया’ मोहिमेतून अपेक्षित नोकऱ्यांची निर्मिती नाही: लार्सन अॅण्ड टुब्रोचे अध्यक्ष
देशातील कलम ३७० आणि तिहेरी तलाक सारख्या विषयांवरून देशात चर्चा रंगली असली तरी सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला रोजगारा सारखा विषय अत्यंत हलाकीच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. राष्ट्रवादाच्या मुद्यात तरुण इतके गुंग झाले आहेत की, बिघडत्या आर्थिक परिस्थितीत त्यांचं आयुष्य कोणत्या भीषण परिस्थितीकडे प्रयाण करत आहे याची त्यांना कल्पना आहे.
6 वर्षांपूर्वी -
वर्षाला २ कोटी रोजगार देणार होते; पण वर्षभरात १.१० कोटी लोकांनी रोजगार गमावले
देशातील कलम ३७० आणि तिहेरी तलाक सारख्या विषयांवरून देशात चर्चा रंगली असली तरी सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला रोजगारा सारखा विषय अत्यंत हलाकीच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. राष्ट्रवादाच्या मुद्यात तरुण इतके गुंग झाले आहेत की, बिघडत्या आर्थिक परिस्थितीत त्यांचं आयुष्य कोणत्या भीषण परिस्थितीकडे प्रयाण करत आहे याची त्यांना कल्पना आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईडीच्या अशा नोटीशीला मनसे भीक घालत नाही: मनसेची प्रतिक्रिया
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेत आपल्या विचाराचे लोक आहेत; आम्ही सरकारी धोरणात हस्तक्षेप करतो, पण......
आरएसएस’चे प्रमुख मोहन भागवत यांनी केंद्र सरकार संबंधित मोठं राजकीय विधान केले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना थेट संघ सरकारमध्ये हस्तक्षेप करते, मात्र का करते याचे देखील कारण मोहन भागवत यांनी सांगितले आहे. ते नागपूरमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान यावेळी त्यांनी इतरही अनेक विषयांवरून सार्वजनिकरित्या भाष्य केले.
6 वर्षांपूर्वी -
बहुमताच्या जोरावर शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही: बच्चू कडू
प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलेच धारेवर धरले आहे. सध्या देशभर कलम ३७० हटवण्यावरून जोरदार चर्चा रंगली असताना, भारतीय जनता पक्षाने ते बहुमताच्या जोरावर केल्याचं म्हटलं गेलं. मात्र आमदार बच्चू कडू यांनी नेमका त्याच बहुमताचा आधार घेत भारतीय जनता पक्षाला लक्ष केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
अण्वस्त्रं प्रथम वापरणार नाही हे आत्तापर्यंतचं धोरण: राजनाथ सिंह
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पोखरणमध्ये मोठं विधान केलेले आहे. आजपर्यंत भारताने कधीही अण्वस्त्राचा वापर पहिल्यांदा केला नाही पण भविष्यात काय घडेल ते तेव्हाच्या परिस्थितीवर निर्भर आहे असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांनी विधान केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचं असेल?
लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ असू शकतात. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ नियुक्त करणार असल्याची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संदर्भात सरकारला सल्ला देण्यासाठी एक उच्चस्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशातील प्रमुख शहरांमधील रिअल इस्टेट उद्योग धोक्यात; बेरोजगारीत वाढ होणार
देशाच्या ७ प्रमुख शहरांमधील २.२ लाख घरांचं बांधकाम २०११ पासून रखडलं आहे. या घरांची एकूण किंमत १.५६ लाख कोटी रुपये आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट जेएलएल इंडियानं देशातील रखडलेल्या घरांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दिल्ली-एनसीआरमधील रिअल एस्टेट प्रकल्पांची काम अतिशय संथ गतीनं सुरू आहेत. देशातील रखडलेली ७१ टक्के घरं दिल्ली-एनसीआर भागातील आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सावधान! जगभरात ९ महिन्यांत मंदी दाखल होणार; नोटबंदीच्या निर्णयाने भारत अजूनच कोलमडणार?
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदी येण्याचे मोठे संकेत दिले आहेत. मार्गन स्टेनली या बँकेच्या मते, जगभरातल्या अर्थव्यवस्था मंदीच्या मोठ्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे लवकरच जागतिक मंदी येण्याची चिन्हे आहेत. पुढच्या ९ महिन्यात ही मंदी येणार असल्याचीही शक्यताही मॉर्गन स्टेनली या बँकेनं वर्तवली आहे. भारतात आधीच नोटबंदीचे दुष्परिणाम झेलणारी अर्थव्यवस्था अजूनच हलाकीची होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम हा बेरोजगारी वाढण्यावर होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
खर्च बचतीसाठी लष्करातून तब्बल २७ हजार जवान कमी करणार
सध्या देशभरातील आर्थिक मंदीचा फटका खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यात वाढत्या आधुनिकीकरणाची भर पडल्याने बेरोजगारीचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. नीटबंदीनंतर देशातील एंक उद्योग बंद पडले असून, त्याचा थेट फटका हा रोजगारावर पडला आहे. त्यामुळे देशातील बेरोजगारीचा प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन! नाणार रिफायनरी संबंधित सौदी कंपनी अरॅमकोची रिलायंसमध्ये मोठी परकीय गुंतवणूक
नवी दिल्ली: रिलायन्स उद्योग समूहात आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक होणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली. रिलासन्स उद्योग २०१८-१९ आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमावणारी समूह असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सौदी अराम्को रिलायन्समधील 20 टक्के शेअर्स खरेदी करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. आज रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
6 वर्षांपूर्वी -
चीन वैज्ञानिक प्रगती करत आहे; अन आपण मंदिर-मशिदीवर वेळ घालवतोय: माजी नौदलप्रमुख
आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये चीननं मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपण मंदिर, मशिदीच्या गोष्टी करत राहिल्यानं केवळ वेळ फुकट जाईल. धर्म, जातपात विसरुन एक देश म्हणून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता असल्याचं मत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
देशातील पर्यावरणाचं वास्तव माहित नसलेला ग्रिल्स म्हणतो 'मोदींना पर्यावरणाची काळजी': सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरणाची प्रचंड काळजी आहे. त्यांचं निसर्गावर प्रेम आहे, असं मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने म्हटलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, भारत याबाबत भरभरुन बोलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना निसर्ग अगदी मनापासून आवडतो याचा अनुभव त्यांच्यासोबत केलेल्या कार्यक्रमात मला घेता आला असं ग्रिल्सने म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
८ तारीख रात्री ८ वाजता नोटबंदी केली; अर्थव्यवस्था आज त्याची किंमत मोजत आहे; मोदी आज देशाला संबोधित करणार
कलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली. त्यानंतर देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL