महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली
राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील विसंवाद समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी आमदार विजय औटी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, उद्धव ठाकरेंना पत्र
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकं व शिवसैनिकांचाही कोरोनाने जीव जातोय आणि मुख्यमंत्री राजकीय सौदेबाजीत
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील देवाणघेवाण, राष्ट्रवादी शिवसेनेला त्यांचे नगरसेवक परत देणार
तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
युतीच्या सत्ताकाळात सुद्धा भाजप-शिवसेना नेत्यांचे असे पक्ष प्रवेश व्हायचे - अंकुश काकडे
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती.
5 वर्षांपूर्वी
लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईतील जुन्या महापौर बंगल्यावर बैठक झाली. -
राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार? - शिवसेनेचा टोला
भारत चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले. चीन सैनिकांशी झालेल्या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी सरकारने डिजीटल स्ट्राईक करून चिनी 59 अॅपवर बंदी आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण, काही दिवस शिवसेना भवन बंद ठेवण्याचा निर्णय
संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या आणि देशातही अतिशय झपाट्यानं पसरणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत आता थेट मुंबईतील शिवसेना भवन या वास्तूपर्यंत येऊन पोहोचली आहे. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सावधगिरीचं पाऊल म्हणून पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय - खा. संजय राऊत
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे माझे स्वप्न आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
मी विचारधारा बदललेली नाही आणि मी डगमगणार नाही - मुख्यमंत्री
मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही.
5 वर्षांपूर्वी -
राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून येत असतात - शिवसेना
राजभवनाच्या दारावर काही चक्रम वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपालांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे, अशा कानपिचक्या ‘सामना’च्या अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेऊन बोलतात
आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या (IFSC) वादात महाराष्ट्राची बाजू घ्यायची सोडून देवेंद्र फडणवीस गुजरातचीच वकिली करत असल्याची जळजळीत टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने १ मे रोजी मुंबईतील प्रस्तावित IFSC केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यूपीए सरकारने २००७ ते २०१४ या काळात मुंबईतील IFSC केंद्रासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे हे केंद्र गुजरातमध्ये हलवण्यात आले, असे सांगत फडणवीस यांनी मोदी सरकारची बाजू उचलून धरली होती.
5 वर्षांपूर्वी -
स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत; शिवसेनेचं टीकास्त्र
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकचं नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरुन राजकारण करण्याची संधी भाजपा नेते सोडत नसल्याचं दिसून येतं.
5 वर्षांपूर्वी -
पालिकेच्या आकस्मित 'कोरोना' बैठकीआडून ८२८ कोटींची रस्त्याची कामं बँक गॅरंटीशिवाय मंजूर?
मुंबईत ‘कोरोना’चा धोका वाढल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आकस्मित बैठक बोलावली. मात्र कोरोनाच्या नावाने स्थायी समितीच तब्बल ८२८.२२ कोटीची रस्त्यांची कामे तातडीने मागू लावण्यासाठी कोणत्याही बँक गॅरेंटीशिवाय कंत्राड देण्यात आलं आहे. भाजपने देखील यावरून मोठा विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार; भाजपने सेनेचे नगरसेवक फोडले
नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडलं आहे. 3 नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. घनसोलीतील तीन नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामा सोपवला आहे. नगरसेवक प्रशांत पाटील, नगरसेविका कमलताई पाटील आणि नगरसेविका सुवर्णा पाटील यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेतचे तिन्ही नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा न्यूजचं वृत्त खरं ठरलं; नवख्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
मनसेने राजकारणासाठी शॅडो कॅबिनेट केली असेल तर आम्ही...शिवसेनेची प्रतिक्रिया
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'युवासेना Mock CET' संकेतस्थळाचं अनावरण - सविस्तर वृत्त
आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर युवासेनेच्या आधुनिक संकल्पनेवर देखील लक्ष केंद्रित केलं आहे. महापालिकेत देखील यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबरोबर इतर ऑनलाईन सर्व्हिस पुरवठादारांच्या सहाय्याने इंजिनियरिंग, फार्मासी, मेडिकल तसेच लॉ अभ्यासक्रमाच्या म्हणजे CET मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी ‘ऑनलाईन मॉक-टेस्ट’ यंत्रणा उभी करण्यावर युवासेनेने काम सुरु केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून 'ते' १ कोटी निधी संदर्भातील ट्विट डिलीट? सविस्तर वृत्त
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारकडून मारहाण झालेला शेतकरी बच्चू भिडूंच्या मदतीने मुख्यमंत्र्यांकडे
शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपल्यावर नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात भुसारे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली पीडित कहानी सरकार दरबारी मांडली. आपल्यावर मोठा अन्याय झाल्याची केविलवाणी भावना आणि संताप त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी, “काळजी करु नको, हे आपल सरकार आहे”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी पीडित शेतकऱ्याला बोलून दाखवला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC