14 December 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मीरा भाईंदर महापालिका | राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु

Mira Bhayandar, Joins NCP party, State president Jayant Patil

मीरा भाईंदर, १९ जानेवारी: मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ हाती बांधले. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच पुनर्प्रवेश केला.

राष्ट्रवादीचा हात सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु झाली आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते डॉ. असिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे आणि रमजान खत्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी माजी आमदार हरिदास भदे यांच्या पुढाकाराने नागपूरमधील धनगर समाजाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र थोटे, भोई समाज बहुद्देशीय फाऊंडेशनचे बंडुभाऊ सुरजुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 

News English Summary: In Mira Bhayandar city, strong influx of NCP has started. In the presence of NCP state president and water resources minister Jayant Patil, several activists, including Mira Bhayander’s former mayor and former opposition leader, re-tied the clock. Leaders and activists from the three major parties, the Bharatiya Janata Party, the Shiv Sena and the Congress, rejoined the NCP.

News English Title: Mira Bhayandar leaders joins NCP party in presence of NCP state president Jayant Patil news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x