26 April 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Viral Video | टायमिंगची गडबड झाली राव, थेट मुलाखतीत बॅग उचलताना चोर कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | एका लाईव्ह टीव्ही मुलाखतीदरम्यान हा चोरटा मधोमध एका व्यक्तीची बॅग चोरताना कॅमेऱ्यात कैद झाला. दिवसाढवळ्या घडलेली ही घटना बार्सेलोना या टुरिस्ट सिटीतील असल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार, या व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी चोराला पकडून तुरुंगात डांबले.

स्पेनच्या बार्सिलोना शहरातून ही घटना समोर येत आहे. अनेक जण आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत समुद्रकिनारी वेळ घालवत होते. या दरम्यान एका लाईव्ह टीव्ही मुलाखतीत तो माणूस काही प्रश्नांची उत्तरं देत होता. इतक्यात मागून एक माणूस बेवारस बॅग उचलून निघून जातो. या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीची कृती संशयास्पद वाटत होती. काही वेळाने बॅगेच्या ठिकाणी दुसरी व्यक्ती येते आणि माझी बॅग चोरीला गेल्याचे सांगून इकडेतिकडे पळताना दिसते.

ही बाब तत्काळ पोलिसांना कळवण्यात आली. थेट मुलाखतीदरम्यान चोरटा कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. पोलिस पथकाने व्हिडिओ फुटेजवरून चोराची ओळख पटवून त्याला अटक केली. तर दुसरीकडे हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात असून आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

युरो न्यूजच्या वृत्तानुसार, बार्सिलोनाच्या गार्डिया अर्बाना पोलिस दलाने दिलेल्या वृत्तानुसार, “सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओ आणि पीडितेच्या अहवालामुळे आम्ही सेंट मिकेल बीचवर झालेल्या एका चोरीची ओळख पटवली आणि अटक केली. बॅगच्या मालकाच्या क्षणिक गैरहजेरीचा फायदा घेऊन चोरट्याने आपली बॅग घेऊन पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र ही बॅग त्याच्या मूळ मालकाला परत करण्यात आली आहे.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video theft steals bag during Live Tv interview police use video to arrest trending video 21 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x