16 June 2024 2:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 16 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 16 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनी ITR भरताना या 10 चुकांपैकी एकही चूक केल्यास महागात पडेल, तुम्ही केली का? Rites Share Price | PSU शेअरची तुफान खरेदी सुरू, फायद्याची अपडेट आली, अल्पावधीत मिळेल मोठा परतावा Kaya Share Price | खरेदी करा हा शेअर! 3 दिवसात दिला 69% परतावा, शॉर्ट टर्ममध्ये मोठा परतावा मिळतोय Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, पैशाने पैसे वाढवा BEL Share Price | डिफेन्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, या बातमीनंतर खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

नगर निवडणूकः भाजपा-एनसीपी'ची खेळी, शिवसेनेला धोबीपछाड, महापौर भाजपचा

नगर : सकाळी अकरा वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्यास सुरुवात झाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर सपा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठींबा दिला. सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला एकूण ०८ मते मिळाली तर एनसीपीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले, नज्जू पहिलावान हे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबतच महापालिकेत हजर झाले.

त्याचवेळी एनसीपी आणि भारतीय जनता पक्षासोबत असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. दरम्यान, सभागृहात महापौर पदासाठी एनसीपी’कडून उमेदवारी दाखल केलेल्या नगरसेवक संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे असे २ उमेदवार अखेर रिंगणात उरले होते.

वाकळे यांना एकूण ३७ मतं मिळाली. त्यात भाजपचे १४, एनसीपीची १८, बसपा ०४ तर अपक्ष ०१ अशा मतांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे बोराटे यांना एकूण ०८ इतकी मते मिळाली. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x