3 May 2024 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

श्रावगी'ज किचन - वरण बट्टी वांग्याची भाजी

Chef - Malini Shravagi

पाककृती - (Procedure)

  1. वरणासाठी तुरीची डाळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.हळद घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या.
  2. नंतर चवीप्रमाणे मिठ घालून पाणी घालून पातळ वरण छान उकळून घ्या.
  3. बट्टयांसाठी सोडा आणि दही सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र करून पिठ छान चोळून घ्यावे.पिठात आळे करून त्यात दही आणि सोडा टाकून एकत्र करा.
  4. पाणी घालून कणीक नरम भिजवून घ्या.अर्धा तास कणीक झाकून ठेवा.
  5. तेलाचा हात लावून कणीक मळून चार गोळे बनवा.
  6. गोल बट्टी बनवून घ्या.उकळत्या पाण्यात एक चमचा तेल घालून एकेक बट्टी पाण्यात सोडा.हाय गॅस करून झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवा.
  7. मधे एक दोनदा हलवून घ्या, नंतर गॅस कमी करून दहा मिनिटे शिजवा.बट्टया वर तरंगायला लागल्या की पाण्यातून काढून थंड होऊ द्या.
  8. तुकडे करून तेलात तळून घ्या.
  9. वांगी कापून पाण्यात टाका.
  10. आलं, लसूण, मिरची बारीक करून घ्या, तेलात मोहरी, जिरे टाकून फोडणी करा.
  11. कढीपत्ता टाका.
  12. आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा शिल्लक ठेवून बाकी पेस्ट आणि सर्व मसाले घालून परतावे.
  13. वांगी, मीठ, एक वाटी पाणी घालून कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्या.
  14. कुकर गार झाल्यावर भाजी रविने छान घोटून घ्या.
  15. एक चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट घालून दोन मिनिटे शिजवा.
  16. कोथिंबीर टाका.
  17. आणि गरमागरम वरण बट्टी वांग्याची भाजीचा आस्वाद घ्या.
bhagyavivah marathi matrimonial भाग्यविवाह मराठी वधू - वर सूचक मंडळ

साहित्य - (Ingredients)

  • वरण (Varan)
  • तुरीची डाळ एक वाटी (Red gram 1 bowl)
  • हळद अर्धा चमचा (Turmeric powder 1/2 tsp)
  • मीठ चवीनुसार (Salt as per taste)
  • बट्टी (Batti)
  • रवाळ कणीक ३ वाट्या (Rough whole wheat flour 3 bowl)
  • रवाळ मक्याच पिठ अर्धी वाटी (Rough corn flour 1/2 bowl)
  • बडीशेप एक चमचा (Fennel seeds 1 tsp)
  • ओवा एक चमचा (Carom seeds 1 tsp)
  • हळद अर्धा चमचा (Turmeric powder 1/2 tsp)
  • जीरे एक चमचा (Cumin seeds 1 tsp)
  • मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
  • तेल दोन मोठे चमचे (Oil 2 tbs)
  • दही दोन मोठे चमचे (Curd 2 tbs)
  • खाण्याचा सोडा अर्धा छोटा चमचा (Baking soda 1/2 tsp)
  • बट्टी तळण्यासाठी तेल (Oil for frying)
  • वांग्याची भाजी (Bringal Bhaji)
  • वांगी ५०० ग्राम (Brinjal 500 gram)
  • हिरवी मिरची १५/१६ (Green chillies 15/16)
  • आलं १” (Ginger 1″)
  • लसूण २०/२५ पाकळ्या (Garlic cloves 20/25)
  • तेल दोन मोठे चमचे (Oil 2 tbs)
  • मोहरी एक चमचा (Mustered seeds 1 tsp)
  • जिरं एक चमचा (Cumin seeds 1 tsp)
  • कढीपत्त्याची पाने २०/२५ (Curry leaves 20/25)
  • जिरं पूड एक चमचा (Cumin powder 1 tsp)
  • हळद अर्धा चमचा (Turmeric powder 1/2 tsp)
  • धणेपूड एक चमचा (Dry coriander powder 1 tsp)
  • गरम मसाला अर्धा चमचा (Garam masala powder 1/2 tsp)
  • मीठ चवीप्रमाणे (Salt as per taste)
  • कोथिंबीर (Coriander leaves)

Shravagi's Kitchen - सविस्तर

Subscribe to Her Channel:   

टीप: रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच जॉईन करा आमचा व्हाट्सअप ग्रुप. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/DLQPiF7lT8V2rzBr6v3y9l

राहुन गेलेल्या बातम्या

x