3 May 2024 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

व्हिडिओ पुरावे; अयोध्या तो बहाणा है? निवडणुकीपूर्वी इथल्या उत्तर भारतीयांच्या मतांसाठी राजकारण: सविस्तर

मुंबई : आज दरवर्षी प्रमाणे शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित झाला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे नेमकी कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता असली तरी त्यातून काही भरीव निष्पन्नं होईल असं राजकीय विश्लेषकांना अजिबात वाटत नव्हतं. कारण मागील ४ वर्षांपासून राजीनामा नाट्याचे इतके प्रयोग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून झाले आहेत की त्यात प्रसार माध्यमांना सुद्धा रस उरलेला नाही. त्यामुळे पुन्हा भाषणात सत्तेला लाथ किंवा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा झाली तरी त्याला कोणीही गांभीर्याने घेईल असे वाटत नव्हते, असच एकूण चित्र आहे. परंतु ठरल्याप्रमाणे विकासाचं राजकारण फसल्याने लोकांना सत्ताकाळात आम्ही काय केलं याचं उत्तर द्यावं लागेल म्हणून अखेर तेच राम मंदिराचं भावनिक शस्त्र अपेक्षेप्रमाणे उपसण्यात आलं आहे आणि २५ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.

त्यात स्वबळाच्या घोषणा सुद्धा देऊन झाल्या असल्या तरी कधी पुन्हा भाजपच्या पंगतीला लोकसभा निवडणुकीच्या आधी जाऊन बसतील याची शास्वती आज एकही राजकीय विश्लेषक देताना दिसत नाही. शिवसेना लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिक जागांच्या मागणीसाठी स्वबळाचं तंत्र पुढे करत आहे, असं आजही अनेक राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. दरम्यान, मागील ४ वर्षात केंद्रात आणि राज्यात शिवसेना विकासाच्या मुद्यावर पूर्णपणे नापास झाल्याचं मतदाराला वाटू लागलं आहे.

दरम्यान, इतर उपलब्ध पुराव्यांवर बोलण्याआधी शिवसेनेच्या महाराष्ट्रातील आणि विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर ते वसई-विरार पट्यातील मतांच राजकारण आणि अडचण समजून घेणं गरजेचं आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावर पहिल्यापासून स्थापन झालेल्या युतीची मतपेटी आणि विशेषकरून शिवसेनेची मत पेटी म्हणजे हक्काची पारंपरिक मराठी मतं मग त्यात आगरी, कोळी आणि कोकणी ही हक्काची पारंपरिक मतं आली हे सर्वश्रुत आहे. त्यानंतर २०१४ पूर्वी हिंदुत्वामुळे तसेच युती धर्मामुळे गुजराती आणि उत्तर भारतीय मतं सुद्धा शिवसेनेच्या पदरात पडायची. दुसरं म्हणजे हिंदुत्व असलं तरी मुंबई व ठाण्यात मुस्लिम आणि खिश्चनांची मतं सुद्धा शिवसेनेला मिळायची हे वास्तव आहे. परंतु २०१४ नंतर मोदी लाटेनंतर आणि भाजपच्या कट्टर हिंदुराष्ट्राच्या प्रचारानंतर मुस्लिम आणि खिश्चनांची मतं भाजप सोबत शिवसेना सुद्धा गमावणार हे वास्तव शिवसेनेच्या धुरंदरांना उमगलं नसणार असं होऊ शकत नाही.

दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील गुजराती मतं एकगठ्ठा मोदी नामावर भाजपच्या पदरात पडणार हे सुद्धा वास्तव आहे. त्यात शिवसेनेचा मराठी हा हक्काचा मतदार सुद्धा आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मनसेकडे वर्ग होण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. तर नाणार प्रकल्पावरून हक्काचा पारंपरिक कोकणी माणूस सुद्धा शिवसेनेवर आगामी निवडणुकीत वक्रदृष्टी टाकण्याची शक्यता आहे हे समाज माध्यमांवरील हवा सूचित करत आहे. राहील उत्तर भारतीय मतपेटीचे जी भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर वर्ग झाली असली तरी आजही शिवसेनेला मतदान करणारा मोठा उत्तर भारतीय समाज शिवसेनेकडे आजही आहे, जो त्यांना आगामी निवडणुकीत मतदान करू शकतो.

कारण शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या प्रतिनिधींचा मोठा आकडा हा मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर ते वसई-विरार पट्यातील आहे. विशेष म्हणजे याच पट्यात राजकीय गणित बदलू शकतात इतकी मोठी उत्तर भारतीय मतं याच पट्यात येतात आणि त्यामुळे जवळ असलेला पारंपरिक मराठी मतदार गृहीत धरून शिवसेनेने उत्तर भारतीय वास्तव्यास असलेल्या सर्व प्रमुख शहरांवर आगामी निवडणुकीसाठी मतांचं गणित आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच प्रत्यय आजच्या दसरा मेळाव्यात आला आहे, कारण हिंदुत्वाच्या आड “२५ नवंबर को अयोध्या मतलब एक झाकी है, लेकिन महाराष्ट्र के उत्तर भारतीय अभी बाकी है” अशी योजना आहे.

दरम्यान, याच अयोध्या दौऱ्यात म्हणजे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात उद्धव ठाकरे अनेक स्थानिक उत्तर भारतातील नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर ते वसई-विरार पट्यातील उत्तर भारतीय वस्त्यांमध्ये उतरण्याचे आदेश देऊ शकतात असे अनेक राजकीय विश्लेषकांनी अंदाज बांधले आहेत. त्यामुळे केवळ उत्तर भारताचा राजकीय प्रवास किंवा दौरा केला असता तर महाराष्ट्रातील मराठी माणसाकडे वेगळाच संदेश गेला असता. त्यामुळे हिंदुत्वाच्या आड आणि अयोध्येच्या मार्गे उत्तर भारताचा दौरा करून तिथल्या समाजाला खुश करणे आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मराठी समाजाकडे सुद्धा मतं मागणं सोपं व्हावं यासाठी केलेला हा राजकीय प्रयोग ठरेल हे नक्की आहे. परंतु लोकं यापुढे मंदिराच्या नावावर मतं देतील हा शिवसेनेचा भ्रम आगामी निवडणुकीत दूर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. दरम्यान, शिवसेनेच्याच आमदारांनी भर मेळाव्यात पक्षाचे डझनभर मंत्री काहीच कामाचे नाहीत असे म्हटल्याने मतदाराने वेगळं काही बोलण्याची गरज नाही. त्यामुळे शिवसेनेला सुद्धा “राम” मंदिर मुद्याच्या भरोसे लढण्यावाचून दुसरा पर्याय नाही असच म्हणावं लागेल.

त्यात गुजरातमधील एका चिमुकलीवर झालेल्या बलात्कारांनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात हिंसाचार भडकल्याने हा उत्तर भारतीय समाज भाजपवर सुद्धा संतापलेला दिसत आहे. कारण अल्पेश ठाकोर यांचं नाव जरी पुढे येत असलं तरी गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांनी ते सर्व रोखण्यासाठी काहीच केलं नाही अशा प्रतिक्रिया उत्तर भारतात उमटल्या आहेत. त्यामुळे गुजरामधील उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचाराचा राजकीय फायदा उचलून महाराष्ट्रातील भाजपकडे वर्ग होणारी उत्तर भारतीय मतं शिवसेनेकडे वर्ग करायची, अशी योजना असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यामुळे अयोध्येच्या नावाने उत्तर प्रदेश दौरा करण्याची आणि महाराष्ट्रातील शिवसेना उत्तर भारतीयांसोबत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश सोडण्याची चाणाक्ष नीती असल्याचे प्रथम दर्शनी समजते. वास्तविक राम मंदिराचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे तरी केवळ राजकीय फायदा आणि उत्तर भारतीय मतं हीच त्यामागील मूळ राजकीय कारणं आहेत.

समाज माध्यमांवरील शिवसेनेबद्दलच्या तरुणांच्या भावना बघितल्यास परिस्थिती कठीण आहे असच म्हणावं लागेल. स्वर्गीय. बाळासाहेबांच्या तारुण्यात मराठीचा मुद्दा घेऊन आणि “हटाव लुंगी बजाओ पुंगी” असे नारे देत मराठीच्या न्याय हक्कांसाठी जन्माला आलेली शिवसेना आज हिंदुत्वाच्या आड लपून मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली ते वसई-विरार सारख्या प्रमुख शहरांमध्ये “उत्तर भारतीय संमेलन” आयोजित करून “उत्तर भारतीयो के सन्मान मे शिवसेना मैदान मे” असे नारे देत थेट “भाई लोकंजी कैसन हवा?” अशा भोजपुरी भाषेत शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि शिवसेनेची तरुण पिढी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली ते वसई-विरार या क्षेत्रात बेधडक पणे हातात माईक घेऊन उत्तर भारतीयांचा आत्मविश्वास वाढवत आहे. इतकंच नाही तर छटपूजेसाठी चौपाटीवर १ घाट मागितला तर ४ घाट देतात अशी स्थिती आहे. गणपती विसर्जनासाठी सुद्धा इतक्या जेट्टी दिल्या नसतील. विशेष म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रात परप्रांतीयांचे लोंढे हे सर्वाधिक ठाणे शहरात धडकतात आणि त्याचा ठाण्याच्या पायाभूत सुविधांवर काय विपरीत परिणाम होतो याचा शिवसेना मतांसाठी जराही विचार करत नाही असच म्हणावं लागेल.

व्हिडिओ पुरावा १: ठाण्यात शिवसेनेचा राजाश्रय मिळत आहे या यूपी-बिहारींच्या लोंढ्यांना आणि त्यांचे भरीव कार्यक्रम पाहा पुराव्यासहित आणि भोजपुरी भाषेतले संवाद सुद्धा.

व्हिडिओ पुरावा २: मुंबई – ठाण्यात उत्तर भारतीय आणि भोजपुरी समाजाचे संमेलनं आयोजित करून शिवसेनेचे आमदार असे खुलेआम “उत्तर भारतीयो के सम्मान में शिवसेना मैदान में” घोषणा देताना दिसतात, कारण हिंदुत्वाच्या आड मतांचं राजकरण नाही का?

व्हिडिओ पुरावा ३: मुंबईमध्ये खेसारी लाल आणि त्याच्या भोजपुरी कलाकारांचे राज्याच्या राजधानीत संमेलनाच्या नावाखाली अश्लील नृत्याचे कार्यक्रम आयोजित करून उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा भोजपुरी वेश परिधान करून करतात. त्यात सुद्धा मनसेच्या मराठी कार्यकर्त्यावर जेव्हा ३०-३५ उत्तर भारतीयांचा हल्ला होतो तेव्हा मराठी त्याला मराठी म्हणून रस्त्यावर नको, परंतु साधा निषेध सुद्धा करत नाहीत. उलट मनसेचं नाव घेऊन उत्तर भारतीयांवर हल्ला केला तर हा शिवसेनेचा आमदार प्रकाश सुर्वे रस्त्यावर उतरण्याची भाषा खुलेआम करतात आणि राज्याच्या राजधानीत मराठी माणसाच्या सन्मानासाठी नाही तर उत्तर भारतीयांच्या सन्मानासाठी लढाई लढण्याची भाषा करतात. हा व्हिडिओ त्याचा पुरावा.

व्हिडिओ पुरावा ४: त्यानंतर शिवसेनेचे एक वजनदार कॅबिनेट मंत्री कुठल्या मराठी कलाकाराचे नाही तर मुंबई – ठाण्यात अश्लील भोजपुरी नृत्यांचे आयोजन करणाऱ्या खेसारी लाल यादव या भोजपुरी कलाकाराचे चाहते आहेत हे त्यांनीच उत्तर भारतीय संमेलनात सांगितलं होतं. त्यामुळे खेसारी लाल यादव याचे कार्यक्रम आहेत आणि मी येणार नाही असं होऊ शकत नाही असं विधान केलं होतं. तसेच उत्तर भारतीयांवर संकट आल्यास शिवसेनेचे आमदार कसे उत्तर भारतीयांची सन्मान रॅली आयोजित करतात याची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला मुंबई या राजधानीत करून देतात. त्याचा हा पुरावा.

महाराष्ट्रातील आणि विशेष करून मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली ते वसई-विरार पट्यात शिवसेनेने मतांसाठी उत्तर भारतीयांकडे पसरलेले हात भविष्यात मराठी संस्कृती आणि भाषेच्या मुळावर न आल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यावेळी राज ठाकरेंचा मराठी भाषा आणि मराठी माणसाप्रती असलेला कट्टरवाद आठवेल, परंतु तो पर्यंत खूप उशीर झालेला असेल हे सुद्धा सत्य आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात शिवसेनेची उत्तर भारतीयांच्या विविध संघटनांची बांधणी आणि जोरदारपणे साजरे होणारे त्यांचे सण याची काही उदाहरणं

 

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x