26 April 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
x

मुंबई उपनगरातील वीज दरवाढीच्या चौकशीचे ऊर्जामंत्र्यांना आदेश

मुंबई : मुंबई उपनगरात याआधीची अनिल अंबानी यांची रिलायन्स एनर्जी कंपनी अदानी समूहाने विकत घेतल्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून आकारण्यात येणाऱ्या वीजदरवाढीविरोधात सध्या विरोधीपक्ष शहरभर आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. त्यानिमित्त आधीच दक्ष झालेल्या भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि तीव्र भावना लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची एका समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, याची दखल घेत फडणवीसांनी तातडीने कार्यवाही करत सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या ऊर्जामंत्र्याना दिले आहेत. मागील काही महिन्यांपासून मुंबई उपनगरात वीज वितरण करणाऱ्या अदानी कंपनीकडून अचानक वीज बिलांमध्ये तब्बल ५० ते १०० टक्के इतकी प्रचंड वाढ करण्यात आल्याच्या तक्रारी हजारो नागरिकांकडून येत आहेत. अदानी समूहाच्या कंपनीकडून प्रत्यक्ष मीटर तपासणी न करताच ही वीज बिलं दिली गेल्याने अनेकी सामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, निवडणुका जवळ आल्या असून हा प्रश्न प्रत्येक घराघराशी संबंधित असल्याने मुंबई उपनगरातील भाजपच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो आणि त्यात अदानी यांचं नाव काँग्रेसने थेट पंतप्रधान मोदींशी जोडल्याने अधिक रोष व्यक्त होऊ शकतो, अशी शंका मुंबई भाजपला आल्याने त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. आता मोदींचे जवळचे असलेल्या अदाणींवर फडणवीस काय दबाव आणणार ते पाहावं लागणार आहे, अशी कुजबुज उपनगरातील विरोधकांमध्ये सुरु झाली आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x