4 May 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार? Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट
x

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ, राज्यपालांनी सावरले

राहुरी : राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ आल्याचे समजते. परंतु, बाजूला उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले. दरम्यान, गडकरी यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

आज दुपारी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान, यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर छोटेखानी भाषण सुद्धा केले. परंतु,कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना त्यांना भोवळ आली आणि ते खाली कोसळले असे वृत्त आहे.

डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना इस्पितळात हलवण्यात आले. दरम्यान, इस्पितळाच्या माहितीनुसार गडकरी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

माझी प्रकृती ठणठणीत- गडकरींचं ट्विट

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x