6 May 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Career After 10th STD | दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसाठी हे आहेत करिअरचे 5 बेस्ट ऑप्शन्स

Career After 10th STD

Career After 10th STD | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (सीबीएसई) विविध राज्यांतील दहावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावीनंतर पुढे कोणता कोर्स निवडायचा, हा आपल्या करिअरबाबतचा सर्वात मोठा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांसमोर असतो. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात हाच प्रश्न असतो की, पुढे आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी कोणता विषय चांगला असेल.

दहावीनंतर करिअरच्या बाबतीत विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असले तरी त्यांनी नेहमीच आवड लक्षात घेऊन विषय निवडावा. नशीबावर आपलं करिअर सोडणं योग्य नाही. विद्यार्थ्यांनी आधी स्वत:ची ओळख पटवून या आधारे आपलं करिअर निवडलं पाहिजे. दहावी पास झाल्यानंतर करिअरचे टॉप 5 पर्याय कोणते आहेत जाणून घेऊयात.

विज्ञान (Science)
सायन्समध्ये इंजिनीअरिंग, मेडिकल, रिसर्च असे करिअरचे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर आहेत. आजच्या काळात पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा करिअरचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय आहे. सायन्स निवडण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही बारावीनंतर सायन्सकडून कॉमर्स किंवा सायन्समधून आर्ट्सकडे वळू शकता. बारावीनंतर सायन्स शाखेसाठी करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेअंतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र मुख्य विषय आहेत. पण अनेक विद्यार्थ्यांना गणित आवडत नाही. मेडिकलमध्ये करिअर करायचं असेल तर मॅथ्स व्यतिरिक्त इतर विषय निवडता येतील.

सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे पर्याय आहेत- B.Tech, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस), बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, B.Sc. होम सायन्स/ फोरेन्सिक सायन्स.

वाणिज्य (Commerce) 
सायन्सनंतर कॉमर्स हा करिअरचा दुसरा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. व्यापारासाठी कॉमर्स सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला फायनान्स आणि इकॉनॉमिक्स आवडत असतील, तर कॉमर्स तुमच्यासाठी आहे. यात चार्टर्ड अकाउंटंट, एमबीए, बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक असे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. अकाऊंटन्सी, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स यांच्याशी तुमची ओळख असली पाहिजे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे पर्याय आहेत- चार्टर्ड अकाउंटंट, बिझनेस मॅनेजमेंट, अॅडव्हर्टायझिंग अँड सेल्स मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट.

कला (Arts)
कला ही शैक्षणिक संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर आर्ट्स हा तुमच्यासाठी योग्य विषय आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल हे प्रमुख विषय आहेत. आर्ट्समध्ये आता करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रोडक्ट डिझायनिंग, मीडिया/मीडिया. पत्रकारिता, फॅशन टेक्नॉलॉजी, व्हिडिओ निर्मिती व संपादन व एचआर प्रशिक्षण, शालेय अध्यापन.

आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट)
ही प्रशिक्षण केंद्रे आहेत. याअंतर्गत शाळा पूर्ण झाल्यानंतर लवकर आणि सहज रोजगार हवा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक कोर्स आहे. कोणताही तांत्रिक अभ्यासक्रम कमी वेळेत पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआय अभ्यासक्रम उत्तम संधी आहेत. आयटीआयमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि ते याच क्षेत्रात काम करू शकतात. आयटीआयनंतर करिअरचे पर्याय- पीडब्ल्यूडी आणि इतर अशा सार्वजनिक क्षेत्रात नोकरीच्या संधी, खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या, स्वयंरोजगार, परदेशातल्या नोकऱ्या.

पॉलिटेक्निक कोर्स
दहावीनंतर मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कम्प्युटर, ऑटोमोबाइल अशा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना विद्यार्थी जाऊ शकतात. यामध्ये कॉलेजमध्ये ३ वर्षांचा, २ वर्षांचा आणि १ वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. डिप्लोमा कोर्सचा फायदा म्हणजे दहावीनंतर कमी वेळात कमी खर्चात नोकरी मिळते. पॉलिटेक्निक कोर्सनंतर करिअरचे पर्याय- प्रायव्हेट सेक्टर जॉब, गव्हर्नमेंट सेक्टर जॉब, हायर स्टडीज, स्वतःचा व्यवसाय. करिअर निवडणं हा तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अल्पावधीतच यश मिळण्यास मदत होईल. त्यामुळे सावधगिरीने विषय निवडावा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Career After 10th STD check the top 5 best options here 27 May 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x