9 May 2024 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
x

मोदी सरकारचे दोन भाऊ, बेरोजगारी आणि महागाई, अदानी-अंबानींच्या सपोर्ट शिवाय मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत - राहुल गांधी

Mehngai Par Halla Bol Rally

Mehngai Par Halla Bol Rally | देशात सातत्याने वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने दिल्लीतील रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरोधात महागाईवर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. बेरोजगारी आणि भाववाढ हे मोदी सरकारचे दोन भाऊ आहेत, असे सांगत काँग्रेसने रविवारी भाववाढीच्या मुद्द्यावरून केंद्रावर तोंडसुख घेतले. हा मोर्चा २०२४ च्या निवडणुकीसाठी नसून भाववाढ आणि बेरोजगारीबाबत जनतेपर्यंत सत्य पोहोचविण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

5 ऑगस्टलाही आम्ही याला विरोध केला होता, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्यासह जवळपास 70 खासदारांना ताब्यात घेण्यात आलं. “12-13 राज्यांमधून लोक येत आहेत आणि आम्ही असंवेदनशील मोदी सरकारला एक प्रभावी संदेश देऊ इच्छितो की या कोसळणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीमुळे लोक त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी उपाय शोधले पाहिजेत’.

महागाईवर हल्लाबोल सभेत राहुल गांधी काय म्हणाले :
महागाईवरील हल्ला बोल रॅलीत राहुल गांधी यांनी भाजप सरकारवरही जोरदार निशाणा साधला. नरेंद्र मोदी आणि भाजप देशात द्वेष पसरवण्याचं आणि देशाला कमकुवत करण्याचं काम करत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या महागाईवर हल्लाबोल सभेत राहुल गांधी रामलीला मैदानावर बोलत होते.

भाजपचं सरकार आल्यापासून द्वेष वाढला :
आज देशात जे घडत आहे किंवा घडत नाही ते तुमच्यापासून लपवता येणार नाही, असे राहुल गांधी यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे. भाजपचं सरकार आल्यापासून देशात द्वेष आणि संताप वाढत चालला आहे. ज्याच्या मनात भीती आहे त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो, असं राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर ज्याला भीती वाटत नाही, तो द्वेष करत नाही. आज भारतात भीती वाढत चालली आहे. ही भविष्याची भीती आहे, महागाईची भीती आहे, बेरोजगारीची भीती आहे. त्यामुळे द्वेषही वाढत चालला आहे.

उद्योगपती द्वेष आणि भीतीचा फायदा घेत आहेत :
राहुल गांधी पुढे म्हणाले की, द्वेषामुळे देशात फूट पडते आणि कमजोर होते. आरएसएस आणि भाजपचे नेते हेच करत आहेत. “या द्वेषाचा फायदा कोणाला होत आहे? गरीब, शेतकरी, मजूर यांना लाभ मिळतोय का? या भीतीचा आणि द्वेषाचा फायदा भारतातील केवळ दोन उद्योगपती घेत आहेत.

सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे :
विमानतळ, बंदर, रस्ते, फोन किंवा तेल असो, सर्व काही या दोन उद्योगपतींकडे जात आहे, असा टोला राहुल गांधी यांनी नाव न घेता लगावला. भाजप सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नोटबंदी केली होती. त्याचा फायदा गरिबांना झाला का? उलट गरिबांच्या खिशातून पैसे काढले गेले. नंतर असे आढळून आले की, सरकारने देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले.

नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का :
उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का, असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला केला. शेतकरी सरकारच्या विरोधात असून तसे नसते तर त्यांच्याविरोधात मजूर व शेतकरी रस्त्यावर उतरले नसते. शेतकरी विरोधात उभे आहेत, हे मोदीजींनी पाहिले तेव्हा त्यांनी कृषी कायदे मागे घेतले. जीएसटीचीही तीच अवस्था आहे, त्याचा फटका छोट्या दुकानदारांना आणि मजूर शेतकऱ्यांना बसला आहे. हे उद्योगपती देशाला रोजगार देत नाहीत. शेतकरी आणि छोटे व्यावसायिक देशाला रोजगार देतात. मोदीजींनी त्यांचे कंबरडे मोडले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mehngai Par Halla Bol Rally Modi government brothers are unemployment inflation said Rahul Gandhi 04 September 2022.

हॅशटॅग्स

#Mehngai Par Halla Bol Rally(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x