27 April 2024 8:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

'वंदे भारत एक्स्प्रेस' या वेगवान ट्रेनचं इंजिन दुसऱ्याच दिवशी फेल, शेवटच्या डब्याचा ब्रेक जाम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या देशातील सर्वात वेगवान ट्रेन १८ मध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला आहे. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून २०० किलोमीटर अंतरावर असतानाच बिघाड झाला. वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीसाठी प्रस्थान केले. यावेळी ट्रेनचं इंजिन फेल झालं. शेवटच्या डब्याचा ब्रेकदेखील जाम झाला होता. यासोबत काही डब्यांमधील वीज गायब झाली.

मिळालेल्या वृत्तानुसार, ट्रेन पूर्णपणे बंद पडण्याआधीच ट्रेनच्या मागील डब्यातून काही आवाज येत होते. दरम्यान, चालकाला अनुभवातून वेगळाच संशय आल्याने लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला. मागील ४ डब्यांमधून धूर आणि विचित्र वास येत होता. यानंतर चाकांमध्ये देखील अडचण येऊ लागली आणि शेवटच्या डब्याचे ब्रेक जाम झाले. युपी’तील टुंडा जंक्शनपासून १५ किलोमीटर अंतरावर सदर घटना घडली असे वृत्त आहे. इंजिनिअर्सनी १० किलोमीटर ताशी वेगाने ट्रेन पुन्हा सुरु केली होती. परंतु, ट्रेनच्या एकूण हरकती पाहून चालकाने ट्रेन थांबवने पसंत केले.

ट्रेन दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु असून रविवारी ट्रेन आपल्या निश्चित वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. देशभरात पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन संताप असतानाच यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हसत हसत हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्धाटन करण्यात आलं होतं. ट्रेन दिल्ली ते वाराणसी अंतर ४५ मिनिटात पूर्ण करेल असा दावा करण्यात आला होता.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x