10 May 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

अंधेरी पूर्व पोटनिवणुकीत शिंदे गटाकडे उमेदवार नसल्याचं स्पष्ट होतंय, म्हणजे सेनेचं चिन्ह गोठवण्याचा घाट भाजपसाठी?

CM Eknath Shinde

Andheri East By Poll Assembly Election | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार ऋतुजा लटके असणार आहेत. त्या उद्या (शुक्रवारी) सकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीमध्ये या जागेवर भाजप उमेदवार मुरजी पटेल देणार हेही जवळपास निश्चित झालं आहे.

ऋतुजा लटके यांच्याविरोधात भाजप मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असल्याची आतापर्यंत चर्चा होती. मात्र भाजपच्या वतीने तशी अधिकृत घोषणा झालेली नाही. तर शिंदे गट ऋतुजा लटके यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळेच ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यात अडथळे निर्माण करण्यात आले, असा आरोपही उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र हायकोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिल्यानंतर आता शिंदे गट नेमकं काय करणार याची उत्सुकता होती.

शिंदे गटाकडे उमेदवारचं नाही :
शिंदे गटाकडे उमेदवारचं नसल्यानं त्यांनी ही जागा भाजपला सोडली आहे. शिंदे गटाचे नेते ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्या अखेरपर्यंत ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यावर ठाम राहिल्या. त्यानंतर शिंदे गटातून मुरजी पटेल यांनाच उमेदवारी देता येते का? याचीही चाचपणी केली. मात्र त्यातही फारसी यश आलं नाही. त्यामुळे अखेर शिंदे गटाने अंधेरीची जागा भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती आहे.

आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडलं :
यावर दीपक केसरकर म्हणाले, जो उमेदवार असेल तो महायुतीचा उमेदवार असणार आहे. पण ती जागा कोण लढवणार याबाबतचा निर्णय शिंदे – फडणवीस साहेब एकत्र बसून घेतील. उद्या सकाळी युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करु. आमच्यामध्ये कधीही भेदभाव राहिलेला नाही. आमच्यासाठी भाजपने मुख्यमंत्रीपद सोडलं, त्यामुळे उद्या कदाचित ती जागा भाजपला सोडली तर गेली तर खूप मोठं काही झालं असं सुद्धा उद्या विरोधकांची बोलण्याची तयारी असणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Andheri East By Poll Assembly Election Shinde Camp do not have candidate 13 October 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x