4 May 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

संबित पात्रांनी व्हिडिओ शेअर केला आणि सरकारच्या उज्वला योजनेची पोलखोल झाली

Sambit Patra, Narendra Modi, Ujjwala Yojana

पुरी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना पक्षाने ओरिसातील पुरी येथून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं आहे. त्यानंतर ते इथे हजर झाले असून जोरदार प्रचाराला लागले आहेत. परंतु, समाज माध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे एकूणच भाजप आणि स्वतः नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

पुरी येथील एका गरीब कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केलं, मात्र त्यातून ते स्वतःच चर्चेत आले आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये ते त्या गरीब कुटुंबाच्या घरी भोजन करताना दिसत आहेत. मात्र सरकारच्या योजनांचा उदोउदो करण्याच्या नादात त्यांनी सरकारच्या ऊज्वला योजनेची पोलखोल केली आहे.

मोदी सरकारने उज्वला योजने अंतर्गत प्रत्येक घरी गॅस पोहोचवल्याचा नेहमीच जाहीर प्रचार केला. मोदींचे अनेक जाहीर कार्यक्रम देखील या योजनेअंतर्गत वृत्तवाहिन्यांवर प्रसारित केले आहेत. मात्र संबित पात्रा ज्या गरीब कुटुंबाच्या घरी निवडणुकीच्या प्रचारावेळी जेवण्याची स्टंटबाजी करत आहेत, ती गरीब महिला आजही चुलीवर जेवण बनवत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट होतं आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या योजना फसव्या असल्याचं त्यांच्याच उमेदवारांच्या स्टंटबाजीतून सिद्ध होतं आहे.

काय आहे तो नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x