10 May 2024 2:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

पुलवामा हल्ला ते लोकसभा निवडणूक...पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील त्रुटींना पंतप्रधान मोदी जवाबदार, माजी लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने खळबळ

General Shankar Roy Chowdhury

General Shankar Roy Chowdhury | माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला जवाबदार ठरवले आहे. घातपातामुळे सैनिक शहीद झाले आणि त्यात गुप्तचर यंत्रणेचं म्हणजे एनएसए’चं अपयश देखील तितकेच जवाबदार आहे असं लष्कराचे १८वे माजी लष्कर सेनाप्रमुख शंकर रॉय चौधरी म्हणाले. थेट माजी लष्करप्रमुखांनी मोदी सरकारला जवाबदार ठरवल्याने पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल अडचणीत सापडले आहेत. एकूण मोदी सरकारचा खरा चेहरा उघड होऊ लागला असून सैनिकांचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला गेल्याची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे. यामुळे भाजप पक्ष प्रचंड अडचणीत सापडला आहे.

पंतप्रधान मोदी हात झटकू शकत नाहीत
पुलवामा हत्याकांडाची प्राथमिक जबाबदारी मोदी सरकारची आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार यातून हात झटकू शकत नाहीत, असे जनरल चौधरी म्हणाले. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींना पुलवामा घटनेचा खुलासा न करण्यास सांगितल्याच्या वृत्तावर टेलिग्राफ वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

केंद्र सरकारला जीवितहानी टाळता आली असती
पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्या जवानांना सीमेवर एअरलिफ्ट करण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली नाही, असा आरोपही सत्यपाल मलिक यांनी केला होता. पाकिस्तान सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर ७८ वाहनांतून २५०० सैनिकांना नेण्यात आले. जनरल चौधरी म्हणाले की, एवढा मोठा ताफा एकत्र असायला नको होता. हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणेत झालेल्या त्रुटीला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणाही जबाबदार आहे. जवानांनी हवाई प्रवास केला असता तर जीवितहानी टाळता आली असती.

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व मोठ्या ताफ्याला नेहमीच हल्ल्याचा धोका असतो. सैनिकांना एअरलिफ्ट करणं सरकारला सहज शक्य होतं आणि ते सैनिकांसाठी अधिक सुरक्षित होते. बोगद्यांमधून होणाऱ्या घुसखोरीमुळे जम्मूतील सांबामार्गे होणारी वाहतूक नेहमीच असुरक्षित असते. आंतरराज्य महामार्गांवर अधिक लष्करी वाहने गेल्यास धोका निर्माण होतो. कारण सीमा दूर असते. ४० सीआरपीएफ जवानांची संख्या मोठी आहे. ते जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले दल होते. आपल्या जवाबदारीपासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही. हवाई वाहतूक विभाग, हवाई दल किंवा बीएसएफमध्ये उपलब्ध असलेल्या विमानांचा वापर करून सैनिकांना एअरलिफ्ट केले जाऊ शकते. जनरल शंकर रॉयचौधरी हे नोव्हेंबर १९९४ ते सप्टेंबर १९९७ या कालावधीत भारतीय लष्करप्रमुख होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: General Shankar Roy Chowdhury statement on Pulwama attack check details on 18 April 2023.

हॅशटॅग्स

#General Shankar Roy Chowdhury(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x