11 May 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार? Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल IREDA Share Price | PSU IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, मल्टिबॅगर स्टॉकला मजबूत फायदा होणार RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत येणार की घसरणार? स्टॉक Buy करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला काय
x

Tata Play IPO | टाटा तिथे नो घाटा! पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, कमाईची सुवर्ण संधी

Tata Play IPO

Tata Play IPO | सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये IPO स्टॉकवर पैसे लावून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. वास्तविक अनेक वर्षांनंतर टाटा समूहाची एक कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टाटा प्ले’. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने टाटा प्ले कंपनीच्या IPO ला परवानगी दिली आहे. आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल करणारी टाटा समूहाची ही भारतातील पहिली कंपनी असेल.

हा IPO टाटा समूहाच्या कंपनीचा 18 वर्षांनंतर येणारा पहिलाच IPO असेल. 26 एप्रिल 2023 रोजी SEBI ने टाटा प्ले कंपनीच्या प्री IPO ऑफर डॉक्युमेंटवर एक निरीक्षण पत्र जारी केले होते. मागील 18 वर्षात टाटा प्ले ही टाटा समूहाची IPO लाँच करणारी पहिली ग्रुप कंपनी ठरली आहे.

ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून सुमारे 3,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO मध्ये फ्रेश शेअर्स आणि दुय्यम शेअर खुल्या बाजारात विकले जाण्याची शक्यता आहे. टाटा प्ले कंपनीला आता IPO लाँच करण्यापूर्वी सेबीकडे अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस-1 दाखल करणे आवश्यक आहे.

लवकरच टाटा समूहातील आणखी एक कंपनी, टाटा टेक्नॉलॉजीज ही पण आपला IPO लाँच करणार आहे. टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीने मार्च 2023 मध्ये ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सेबीकडे दाखल केला होता. या कंपनीलाही लवकरच सेबीकडून IPO लाँच करण्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीचा आयपीओ आकार 4,000 कोटी रुपये असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Play IPO is ready to launch check details on 04 May 2023.

हॅशटॅग्स

Tata Play IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x