4 May 2024 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या Penny Stocks | कुबेर पैशाचा पाऊस पाडतोय या 10 पेनी शेअर्समधून! 1 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा, खरेदी करणार? Infosys Share Price | इन्फोसिस, Wipro, TCS आणि HCL शेअर्सबाबत तज्ज्ञांची भविष्यवाणी, 4 IT शेअर्स मालामाल करणार? Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त झालं, नवे दर तपासा Mahindra XUV700 | महिंद्राची नवी SUV भारतात लाँच, मिळणार जबरदस्त एक्सटीरियर आणि इंटिरिअर
x

बिहारमध्ये मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित

Loksabha Election 2019

पाटणाः देशात लोकसभेच्या ५व्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. बिहारमध्ये ५व्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सारण लोकसभा मतदारसंघात हा धाकायदायक प्रकार घडला आहे. हाती माहितीनुसार, सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील १३१ नंबर मतदान केंद्रावर ही ईव्हीएम मशिन फोडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकरणी रणजित पासवान याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकारानंतर नयागावातील मतदान केंद्र संख्या १३१ वरची मतदान प्रक्रिया खंडित करण्यात आली आहे. सारणच्या जागेवरून एनडीएचा सरळ सरळ महागठबंधनशी मुकाबला आहे. या जागेवरून लालूंचे नातेवाईक चंद्रिका राय महागठबंधनचे उमेदवार आहेत. तर एनडीएकडून राजीव प्रताप रुडी रिंगणात आहेत. बिहारमधल्या पाच लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहेत.

सीतामढी, मधुबनी, मुजफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर हे मतदारसंघ ८२ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत. या ५व्या टप्प्यात सारणमधून भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि आरजेडीचे चंद्रिका राय, हाजीपूरमधले आरजेडीचे शिवचंद्र राम, एलजेपीचे पशुपती कुमार पारस, मधुबनीच्या व्हीआयपीचे बद्री पूर्वे, अपक्ष शकील अहमद, मुजफ्फरपूरमधले बीएसपीच्या स्वर्णलता देवी आणि भाजपाच्या अजय निषाद, सीतामढीतले जेडीयूचे सुनील कुमार पिंटू, आरजेडीचे अर्जुन राय यांच्यासह प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x