2 May 2024 3:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

पंतप्रधानपदात मला रस नाही, मोदीच पुन्हा यापदी विराजमान होतील : गडकरी

Nitin gadkari, Narendra Modi, Loksabha Election 2019

भोपाळ : पंतप्रधानपदात मला अजिबात रस नाही, त्यामुळे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार आहेत आणि यंदाही तेच पंतप्रधान होतील, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. काल भोपाळ येथे एका प्रचार कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात का? प्रश्न विचारला त्यावर बोलताना गडकरी म्हणाले, पंतप्रधानपद हा माझा अजेंडा नसल्याचे मी यापूर्वीही अनेकदा स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदीच या पदाचे उमेदवार असून तेच पुन्हा पंतप्रधान होतील. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने जितक्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्ष यावेळी जिंकेल, असा विस्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील ५ वर्षात आमच्या पक्षाने महामार्ग, जलमार्ग, कृषी यांसह विविध क्षेत्रात खूप चांगली कामे केली आहेत. त्यामुळे विकास हा आमच्या पक्षाचा निवडणुकीचा मुख्य अजेंडा आहे. हेच आमचं निवडणुकीतील भांडवल असून देशाला सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवण्याच्या दिशेने आमचे काम सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने भाजपा सरकारने ठोस पावले उचलली आहेत. काँग्रेसने गेल्या ५० वर्षात जितकी कामं केली नाहीत तितकी आम्ही गेल्या ५ वर्षात केली, असा दावा करताना मोदींच्या नेतृत्वेने देशाला दिशा देण्याचं महत्वाचे काम केल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x