16 May 2024 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

BJP Election Marketing | मंगलमूर्ती बाप्पाच्या नावाने सुद्धा 'मोदी मार्केटिंग' राजकारण, कोकणासाठी विशेष ट्रेन 'नमो एक्स्प्रेस'चे उद्घाटन

BJP Election Marketing

BJP Election Marketing | लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मंगलमूर्ती बाप्पाच्या भाजपने ‘मोदी मार्केटिंग’ची संधी साधली आहे. संपूर्ण देशात, विशेषत: मुंबईत गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू झाला आहे. मुंबईतील दादर स्थानकातून कोकणासाठी विशेष ट्रेन ‘नमो एक्स्प्रेस’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. यंदाचा उत्सव अधिक भव्य करण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले अशी राजकीय मार्केटिंग करण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणी लोकांमध्ये भाजप आणि मोदींबद्दल अजिबात आकर्षण नाही

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मंगलमूर्ती बाप्पाच्या आडूनही भाजपने ‘मोदी मार्केटिंग’ची संधी साधल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसही कोकणी लोकांमध्ये भाजप आणि मोदींबद्दल कोणताही आकर्षण नाही. मात्र कोकणातील निसर्गाला घातक ठरेल अशा रिफायनरी प्रकल्पाच्या हट्टामुळे भाजप विरोधात रोष नक्कीच आहे. मागील गणेश चतुर्थीच्या काळात कोकणातील घराघरात याच मुद्दयावर चर्चा सुरु होती. त्यामुळे आता या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाजपने मोदी मार्केटिंगची संधी साधली आहे.

त्यासाठीच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र भाजपने कोकण रेल्वेला मार्केटिंगसाठी लक्ष केले आहे. आज फडणवीसांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आली. तसेच प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी सहा विशेष गाड्या आणि ३३८ बसेस चालविण्यात येणार आहेत.

१९ सप्टेंबर ला गणेश चतुर्थी आहे

महाराष्ट्राच्या व्यवस्थेबरोबरच मध्य रेल्वेही उत्सवासाठी १५६ गणपती विशेष गाड्या चालवून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या या गाड्यांचे बुकिंग सुरू असल्याने भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. गणेश चतुर्थी उत्सव १९ सप्टेंबरपासून सुरू होत असून तो दहा दिवस चालणार असून २९ सप्टेंबररोजी संपणार आहे. उत्सवाची सांगता सार्वजनिक मिरवणुकीत मूर्तीचे विसर्जन करून संगीत आणि सामूहिक जयघोषाने होते.

News Title : BJP Election Marketing Ganesh Chaturthi special NAMO Express 16 September 2023.

हॅशटॅग्स

#BJP Election Marketing(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x