28 April 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

राज्य विधानसभा आल्या! मोदी भारताचे आणखी एक छत्रपती शिवाजी महाराज: मंत्री विजय गोयल

Chatrapati Shivaji Maharaj, PM Narendra Modi, BJP MP Vijay Goel, Article 370, Jammu and Kashmir, Ladakh

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचं विभाजन आणि कलम ३७० हटवल्याचा प्रस्ताव राज्यसभेत पारित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार गुमान सिंह यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे खासदार यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यावधी भारतीयांना आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला पाहिजे अशी मागणी सभागृहाच्या शुन्य प्रहारात करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशा शब्दात मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. कलम ३७० हटवणं हा एक धाडसी निर्णय आहे. या निर्णयामुळे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी भाजप खासदार विजय गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नरेंद्र मोदींची लढाई निरंतर आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या रतलाम मतदारसंघाचे खासदार गुमान सिंह यांनी लोकसभेत शुन्य प्रहारवेळी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरपूर कौतुक केलं. त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे युगपुरुष आहेत. मोदींना जगभरातील अनेक देशांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरबद्दल त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कोट्यावधी भारतीयांना आनंद झाला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना भारतरत्न द्यावा अशी मी मागणी करतो.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x