11 May 2024 8:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

आरे'तील झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे PoK'वर धाडणार का? सविस्तर वृत्त

PoK, Aaditya Thackeray, Aarey Forest

मुंबई: आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. केवळ संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात सज्ज ठेवण्यात आली होती. दरम्यान, पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला होता. मुंबईकरांनी आंदोलनं करत झाडांची कत्तल करण्यास तीव्र विरोध अटकाव केला होता. त्यावेळी सर्व परिस्थितीमुळे रात्रभर आरे’मध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होते. दरम्यान, उपस्थित पोलिसांनी देखील अनेक आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत थेट न्यायालयात हजर केलं होतं.

‘उच्च न्यायालयाने या प्रश्नावरील आमची याचिका तांत्रिक कारणावरून फेटाळताना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सुचवले होते. त्यामुळे आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊ’, असे ‘वनशक्ती’चे याचिकादार डी. स्टॅलिन यांनी प्रसार माध्यमांना सांगितले होते. मात्र त्याआधीच ‘मेट्रो ३’साठी रात्रीच्या अंधारात आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवणं हा लज्जास्पद आणि किळसवाणारा प्रकार ठरवून घडवला गेला. झाडे तोडण्यासाठी मेट्रो प्रशासनाच्या उर्मट अधिकाऱ्यांनी प्रचंड तत्परता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट ‘पाकव्याप्त काश्मीर’मध्ये पाठवा आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची ड्युटी द्या,’ असा जोरदार हल्ला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी चढवला होता.

दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. ‘आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.

मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले असून, स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे हे मेट्रो-३ संबधित ते उर्मट अधिकारी पीओके’वर नाही, मात्र चंद्रपूर-गडचिरोलीच्या जलद विकासाठी तरी आदित्य ठाकरे पाठवतील का अशी चर्चा मुंबईतील पर्यावरण प्रेमींमध्ये रंगली आहे. अन्यथा त्यांनी केलेलं विधान केवळ राजकीय स्वार्थापोटी केलेलं ठरेल असं म्हटलं जातं आहे.

नेमकं काय ट्विट केलं होतं आदित्य ठाकरे यांनी;

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x