8 May 2024 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

पुणेकरांनी 'आफ्टरनून लाइफ'चं वक्तव्य विनोदाने घ्यावे: आदित्य ठाकरे

Environment minister of State Aaditya Thackeray, Punekar Night Life, Punekar Afternoon Life

पुणे: आदित्य ठाकरे हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘प्लास्टिक वापर बंदीबाबत पुणे चांगली भूमिका बजावत आहे, इकोफ्रेंडली वातावरणासाठी पुणे चांगली दिशा दाखवू शकते. पुण्यात ज्या प्रकारे कापडी पिशव्यांचा बांबूच्या वस्तूंचा वापर केला जातो, त्या गोष्टी राज्यात किंबहुना देशातही सगळीकडे व्हायला हव्यात.पुण्याला कार्बन मुक्त करण्यासाठी २०३० टार्गेट आहे, परंतु पुणे २०२५ मध्ये ते पूर्ण करेल असा मला विश्वास आहे. महाविकास आघाडीचं सरकार पर्यावरणासाठी सकारात्मक आहे. जगातील बेस्ट प्रॅक्टिस राज्यात आणणार असंही नमूद करायला ते विसरले नाहीत.

मुंबईतील ‘नाइट लाइफ’च्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ‘नाइट लाइफ’चा निर्णय राज्यातील अन्य महानगरांत, विशेषत: पुण्यात लागू होणार का?, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ सुरू करूया’ अशी खोचक टिपण्णी आदित्य यांनी केली होती. त्यावर जोरदार उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला होता. त्यानंतर पुणेकरांनी समाज माध्यमांवरून टीका करताच त्यांनी, ‘पुणेकर माझे वक्तव्य विनोदाने घेतील आणि त्याबाबत तेही विनोद करतात’ अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या वक्तव्यावर पडदा टाकला आहे.

राज्याच्या पर्यावरणाचा विचार करता, येत्या काळात शहरांतील रस्त्यांवर इलेक्ट्रिक आणि हायब्रीड बस धावतील. यावर आमच्या सरकारच लक्ष केंद्रित असणार आहे. आघाडीचे सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title:  Punekars should take my statement as just a Humor says Environment minister of State Aaditya Thackeray.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x