28 April 2024 6:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे वृद्धपकाळाने निधन

Marathi Actor Raja Mayekar, passed away

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हिंदमाता येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांत त्यांनी काम केले. दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. ‘लोकनाटय़ा’द्वारे व्यावसायिक रंगभूमी त्यांनी जवळून पाहिली. संगीत नाटके आणि बालगंधर्वाच्या नाटकांचे प्रयोगही त्यांनी केले. विनोदाची पातळी कधीही घसरू न देता त्यांनी केलेल्या अभिनयाची आठवण आजही काढली जाते.

गुंतता हृदय हे, सूर राहू दे ,गहिरे रंग, श्यामची आई ,धांदलीत धांदल ,भावबंधन,एकच प्याला,संशयकल्लोळ,बेबंदशाही,झुंझारराव ही त्यांची गाजलेली नाटकं. तसेच धाकटी बहिण,स्वयंवर झाले सीतेचे ,कळत -नकळत, या सुखांनो या, झंझावात,लढाई, धम्माल गोष्ट नाम्याची हे त्यांनी भूमिका केलेले काही गाजलेले सिनेमे. गुंतता हृदय हे नाटकातील सोमजी मास्तर ही त्यांची अतिशय गाजलेली भूमिका.. राजा मयेकरांनी दूरदर्शनवरील हास परिहास,गजरा ,श्रध्दा, असे पाहुणे येती या कार्यक्रमातही महत्वाच्या भूमिका केल्या होत्या.

 

Web Title: Veteran Marathi Actor Raja Mayekar passed away.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x