2 May 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

अजित दादांचा 'बारामती पॅटर्न' जिंकणार, बारामतीत उरला केवळ एक कोरोना रुग्ण

Covid 19, Corona Crisis, Baramati

पुणे, २४ एप्रिल: शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) रेड झोनमधील नागरिकांची तपासणी युध्दपातळीवर सुरू असल्याने, आत्तापर्यंत लक्षणे दिसून न आलेले पण कोरोनाचा संसर्ग झालेल्या अनेक व्यक्ती उजेडात येऊ लागल्या आहेत. गुरूवारी एकाच दिवसात प्रथमच शंभरपेक्षा अधिक रूग्ण आढळून आले. आज तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी तब्बल १०४ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ८७६ झाला आहे.

दरम्यान, आज पुणे विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १ हजार ३१ झाली असून विभागात १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

दुसरीकडे बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी चार रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या रूग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबवलेल्या ‘बारामती पॅटर्न’ला यश येत असून तालुक्यात कोरोना संसर्ग झालेला एकच रूग्ण राहिला आहे. त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याने बारामतीतील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बारामती शहरात प्रथम एका रिक्षाचालकाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्याच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी कळवले होते. या कुटुंबांतील वयोवृद्ध असणाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता, तर याच कुटुंबातील मुलगा, सून यांच्यासह आठ वर्षाच्या आणि एक वर्षाच्या नातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. चौदा दिवसांनंतर या रूग्णांची पुन्हा तपासणी केली असता त्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.

तत्पूर्वी, रिक्षाचालकाचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दहा दिवसांपूर्वीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून बारामती येथील घरात त्यास होम क्वारान्टाइन करण्यात आले आहे. अजित पवारांनी यंत्रणेला दिलेलं सक्तीचे आदेशामुळे बारामती पॅटर्नच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्याने याला यश येताना दिसत आहे.

 

News English Summary: Four out of five members of the same family infected with corona in Baramati have been reported negative and will be discharged from the hospital today. Therefore, the ‘Baramati pattern’ implemented by Deputy Chief Minister Ajit Pawar is succeeding and only one patient has been infected with corona in the taluka. Citizens of Baramati have breathed a sigh of relief as he is also undergoing treatment.

News English Title: Story corona virus success to Deputy Chief Minister Ajit Pawars Baramati pattern Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x