7 May 2024 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

निर्णय सरकारचा आहे, त्यामुळे सरकारने सरकारसारखं प्लास्टिक बंदीच्या उपाय योजनांवर बोलावं, नात्यांवर नाही: राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सरकार काय उपाययोजना आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणार आहे यावर बोलावं. प्लास्टिक बंदीचा निर्णय नात्याशी जोडू नये असं उत्तर देत रामदास कदमांना त्यांची जागा दाखवून दिली.

नाशिक महापालिकेतील मनसेच्या सत्ताकाळात याच विषयावर केलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी उपस्थित पत्रकारांना करून दिली आणि या संबंधित व्यवस्थापन कस अंमलात आणावं याचे धडे सुद्धा अप्रत्यक्ष पणे विद्यमान सत्ताधाऱ्यांना दिले. सरकारने आणि महापालिकेने आधी स्वतःची जवाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि नंतर सामान्य जनतेवर दंड आकारावा असं खरमरीत उत्तर त्यांनी सरकारला दिल.

सामान्यांना आधी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी होती आणि नंतर सरकारने प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण गरजेचं होत असं राज ठाकरे म्हणाले. एकूणच आजच्या पत्रकार परिषदेत पर्यावरण मंत्री रामदास कदमांच्या आणि अप्रत्यक्ष पणे शिवसेनेच्या प्लास्टिक बंदीच्या राजकारणाची राज ठाकरेंनी हवाच काढून टाकली आहे असंच म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x