29 April 2024 11:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

कोरोना आपत्ती | दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत पुन्हा एकदा जगात टॉपवर

Corona Pandemic

नवी दिल्ली, २० एप्रिल: सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी 2.50 लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. खरेतर चांगली गोष्ट म्हणजे रविवारच्या तुलनेत यामध्ये घट झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात 2 लाख 56 हजार 828 लोक संक्रमित झाले आहेत. रविवारी 1.75 लाखपेक्षा जास्त लोक पॉजिटिव्ह आढळले होते. पहिल्यांदाच विक्रमी 1 लाख 54 हजार 234 लोकही बरे झाले. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 18 एप्रिलला 1.43 लाख लोक रिकव्हर झाले होते.

दुसरीकडे वाईट गोष्ट म्हणजे संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 1.80 लाखांच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 लाख 80 हजार 550 लोकांनी जीव गमावला आहे. दररोजच्या मृतांच्या आकड्यामध्ये भारत देश पुन्हा एकदा टॉपवर गेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. ब्राझीलमध्ये सध्या दररोज जवळपास 1,500 लोकांचा मृत्यू होत आहे. तर अमेरिकेमध्ये हा आकडा 400-600 एवढा आहे. भारतात सोमवारी 1,757 रुग्णांचा मृत्यू झाला.

सोमवारी 78.37% म्हणजेच 2.01 लाखांपेक्षा जास्त रुग्ण देशातील 10 राज्यांमध्ये सापडले. सर्वात जास्त महाराष्ट्रात 58,924 संक्रमित आढळले. उत्तर प्रदेशात 28,211, दिल्लीमध्ये 23,686, कर्नाटकात 15,785, केरळमध्ये 13,644, छत्तीसगडमध्ये 13,834, मध्यप्रदेशात 12,897, तामिळनाडूमध्ये 10,941, राजस्थानमध्ये 11,967, गुजरातमध्ये 11,403 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

दरम्यान, भारतात झालेल्या करोना उद्रेकामुळे इतर देश सावध झाले आहेत. हॉगकाँगने भारतीय विमानांना प्रवेश बंद केला आहे. तर अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अमेरिकनं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. भारतात रुग्णसंख्या वाढल्यामुळे नागरिकांनी भारताचा दौरा करणं टाळावं. पूर्णपणे लसीकरण झालेलं असलं तरीही संसर्ग होण्याचा व विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतात जाणं टाळावं. जर जाणं अत्यावश्यक असेल, तर आधी पूर्णपणे लसीकरण करून घ्यावं,” असं रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं म्हटलं आहे.

 

News English Summary: India has once again topped the daily death toll due to corona. Brazil is second and the United States is third. About 1,500 people are currently dying every day in Brazil. In the US, the figure is 400-600. In India, 1,757 patients died on Monday.

News English Title: India has once again topped the daily death toll due to corona news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x