5 May 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

लॉकडाऊन गोंधळ | वडेट्टीवार यांचीही बाजू सावरत अजितदादा म्हणाले, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

Mahavikas Aghadi

मुंबई, ०४ जून | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचीही बाजू सावरून घेतली आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक होणार असल्याची माहिती दिली होती. करोना संसर्गाचा दर आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या निकषावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे व हे जिल्हे टप्प्याटप्प्यानं निर्बंधमुक्त होतील, असं त्यांनी सांगितलं होतं. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असंही ते म्हणाले होते.

ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत खुलासा केला. ‘असा कुठलाही निर्णय झालेला नाही. निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे’, असं म्हटलं होतं. त्यामुळं मोठा संभ्रम निर्माण झाला होता. विजय वडेट्टीवार यांनी काल त्यावर स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र, विरोधी पक्षानं या निमित्तानं राज्य सरकारवर टीकेची संधी साधली.

 

News English Summary: Deputy Chief Minister Ajit Pawar commented today. There is complete harmony in the state government about unlock. No matter what party the government belongs to, whatever the Chief Minister of the state says is final, ‘said Ajit Pawar. He has also sided with Relief and Rehabilitation Minister Vijay Wadettiwar.

News English Title: Deputy CM Ajit Pawar reply on Maharashtra unlock phase misinformation news updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x