9 May 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Religious Adhyatma | घरातील देव्हाऱ्यात कधीही ठेवू नका या गोष्टी - नक्की वाचा

Religious Adhyatma

मुंबई, २७ जून | प्रत्येक हिंदू घर देव्हाऱ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.आपआपल्या श्रद्धेनुसार प्रत्येकाच्या घरी देव्हारा असतो. काही जणांकडे लाकडाचा, काचेचा तर काहींकडे संगमरवरी किंवा मार्बलचा देव्हारा असतो. घराच्या योग्य कोपऱ्यात किंवा जागी देव्हारा ठेवला जातो. हल्ली इतक्या नवीन प्रकारचे देव्हारे येतात की, या देव्हाऱ्यांमध्ये देवपूजेचे सामान ठेवण्यासाठी वेगवेगळे कप्पे देखील असतात. कधी कधी अनाहूतपणे या कप्प्यांमध्ये नको नको त्या गोष्टी कोंबल्या जातात. तुम्ही देव्हाऱ्यात काय काय ठेवता हे एकदा तपासा कारण खूप जणांचा देव्हारा हा अडगळीचा एक कोपरा बनून गेला आहे. खूप जणं देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवतात. तुम्हीही देव्हाऱ्यात अगदी काहीही ठेवत असाल तर तुमच्यासाठी आजचा विषय हा फारच महत्वाचा आहे.

जिथे आपण देवाची उपासना करतो असे घरामधिल मंदिर हे एक पवित्र स्थान आहे. स्वाभाविकच, ते एक सकारात्मक प्रभावाचे आणि शांततामय स्थान असणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार स्थापिलेले मंदिर, त्या घरातील रहिवाशांचे आरोग्य, समृद्धी व आनंद आणू शकते. स्वतंत्र पूजा कक्ष असणे आदर्शवत आहे, परंतु महानगरात, जेथे जागा कमी आहे तेथे हे नेहमीच शक्य नसते. अशा घरांसाठी आपण आपल्या आवश्यकतेनुसार भिंतीमध्ये उभारलेले मंदिर किंवा घरामधिल एखाद्या लहान कोपऱ्याचा मंदिरासाठी विचार करू शकता.

देव्हाऱ्यात या गोष्टी कधीही ठेवू नका:
* काही वस्तू या अगदी सगळ्यांच्याच देव्हाऱ्यात अनाहुतपणे ठेवल्या जातात. तुमच्याही देवघरात असतील तर आताच त्या काढून टाका

* पूजाविधीसाठी आणलेली सामग्री जर शिल्लक राहिली असेल तर आपण ती तशीच पिशवी भरुन देव्हाऱ्यात ठेवून देतो. पण असे करणे अजिबात चांगले नाही. कारण अशा अर्धवट राहिलेल्या गोष्टी अशांती आणतात. एकतर पूजेसाठी आणलेले सगळे साहित्य पूर्ण वापरा किंवा जर ते शिल्लक राहिले असेल तर ते विसर्जित करणे अधिक चांगले

* आपण देवाला हार घालतो किंवा फुलं वाहतो. पण ती फुलं खूप जण देव्हाऱ्यात तशीच ठेवून देतात किंवा घातलेला हार तसाच देव्हाऱ्यात ठेवतात. त्यामुळे फुलं तशीच वाळतात अशी वाळलेली फुलं ही नकारात्मक उर्जा पसरवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे फुलं वाहिल्यानंतर ती त्याच दिवशी संध्याकाळी काढून विसर्जित करावी किंवा झाडांमध्ये टाकावी. पण देव्हाऱ्यात ठेवू नये.

* बरेचदा एखादी मूर्ती तुटकी किंवा भग्न झाली की ती आपण विसर्जित करण्यासाठी म्हणून देव्हाऱ्यात ठेवतो आणि ती तशीच पडून राहते. अशा मूर्ती लगेच काढून टाका. कारण त्यामुळे नकारात्मक उर्जा पसरते शिवाय अनेक अडचणी येतात.

* खूप जणांच्या घरात शंख देखील असतात. असे शंख हे संध्याकाळी पूजेच्या वेळी वाजवले जातात. पण जर तुमच्या देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख असतील तरी देखील ते शुभ मानले जात नाही. त्यामुळे देव्हाऱ्यात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नका.

* खूप जणांना घरी शिवलिंग ठेवण्याबाबतही अनेक शंका असतात. शिवलिंग हे फारसच संवेदनशील असते. कारण शिवलिंग घरात ठेवायचा विचार करत असाल तर तुम्ही अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराचे शिवलिंग देव्हाऱ्यात ठेवू नका. कोणत्याही सल्ल्याशिवाय तुम्ही देव्हाऱ्यात शिवलिंग अजिबात ठेवू नका.

* देव्हाऱ्यात खूप जणांना जुने जुने फोटो ठेवायची सवय असते. असे अजिबात करु नका. कारण असे जुने फोटो ठेवणे हे देखील अजिबात चागंले नाही असे फोटो देव्हाऱ्यात ठेवण्याऐवजी तुम्ही ते भिंतीवर लावा. त्यासाठीही योग्य सल्ला घ्या.

* देव्हारा हा स्वच्छ असावा त्यामध्ये अडगळीच्या कोणत्याही वस्तू ठेवू नका. जर त्या असतील तर असाच काढून टाका. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा मिळेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Religious Adhyatma things not to keep in home Mandir article news updates.

हॅशटॅग्स

#Religion(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x