26 April 2024 8:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

चिंताजनक | ऑनलाईन शिक्षणातून पैसा | बालभारतीच्या अ‍ॅप्लिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार

Ebalbharati books diksha app

मुंबई, ३० जून | कोरोना काळात शाळा बंद असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोरील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता ज्या ऑनलाईन शिक्षणाच्या भरोसे पालक मुलांना अभ्यासात व्यस्त ठेवत आहेत त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या गरजेतून पालकांची लूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

कारण, बालभारतीकडून पुरवण्यात येणाऱ्या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. अगोदरच ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना स्मार्टफोन किंवा टॅब घेऊन देण्याची वेळ पालकांवर आली होती. अशातच आता बालभारतीचे ई-साहित्य सशुल्क झाल्याने पालकांना नवा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

बालभारतीकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे ई-साहित्य उपलब्ध म्हणून पाठ्यपुस्तकांची पीडीएफ, ‘दिक्षा अ‍ॅप’द्वारे व्हिडिओ असे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. अशात आता अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा असेल, तर विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने ‘ई-बालभारती’ अ‍ॅप केलं विकसित केले आहे. मात्र, हे अ‍ॅप वापरण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयावर शाळा, शिक्षक, विद्यार्थी-पालक यांनी केली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर टीकेचा सूर उमटल्यानंतर बालभारतीकडून तातडीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सर्वांनीच नवे अ‍ॅप वापरण्याची सक्ती नाही. या अ‍ॅपसाठी बालभारतीकडून 50 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. या अ‍ॅपवर सध्या इयत्ता पहिले ते पाचवी आणि इयत्ता दहावी मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे ई-साहित्य उपलब्ध होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Now onward students have to pay for online Ebalbharati books diksha app news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x