26 April 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

RSS'चे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी राम मंदिर प्रोजेक्टचे केअरटेकर | यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी RSS सतर्क

Ram Janmabhumi Land scam

लखनऊ, ३० जून | अलीकडेच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी असा आरोप केला होता की, मंदिर बांधकामासाठी ट्रस्टने 2 कोटी रुपयांची जमीन 18 कोटींपेक्षा जास्त रुपये देऊन खरेदी केली आहे. याशिवाय इतरही अनेक भूखंड खरेदीमध्ये अनियमिततेचे आरोप इतर काही लोकांनीही केले आहेत.

औपचारिकरित्या अयोध्येत राम मंदिर प्रोजेक्टचे काम रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्ट करत आहे, ज्याचे सचिव चंपत राय आहेत. राय यांना विश्व हिंदू परिषदेकडून ट्रस्टसाठी निवडले गेले आहे. अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत 3000 कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाले आहेत, परंतु संपूर्ण अयोध्याचा विकास करण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये सुमारे 10,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे.

मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याची कमान घेतली आहे. आतापर्यंत संघाचे सरकार्यवाह राहिलेले भैय्याजी जोशी आता मंदिर प्रोजेक्टच्या केअरटेकरची भूमिका पार पाडतील. म्हणजेच आता हा संपूर्ण प्रोजेक्ट भैय्याजी जोशी यांच्या देखरेखीखाली चालणार आहे. संघामध्ये हा निर्णय अनौपचारिकरित्या घेण्यात आला आहे.

वास्तविक, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरही आरएसएसचे लक्ष आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांबाबत भाजपची स्थिती मजबूत असल्याचे म्हटले जात नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यातील संघर्ष कुणापासून लपलेला नाही. त्याचा भाजपच्या दलित व्होट बँकेवर होणारा परिणाम नाकारता येणार नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन संघाचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आता लखनऊमध्ये राहणार आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ayodhya Ram Mandir project RSS takes command of the project appoints senior RSS leader Bhaiyaji Joshi news updates.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x