9 May 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली | ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी

Eknath Khadse

मुंबई ०८ जुलै : भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयने (ईडी) समन्स बजावला. ईडीकडून खडसे यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. ईडी कार्यालयात हजर राहण्याआधी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात सकाळी दहा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र रात्री उशीरा त्यांची प्रकृती खालावली असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली. तसेच दहा वाजता घेणारी पत्रकार परिषदही रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रकृती खालावल्याने नंतर एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार का? याबाबत देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी
पुणे इथल्या भोसरी भागातील जमीन घोटाळ्याप्रकरणी बुधवारी एकनाथ खडसे यांना ईडीकडून एक धक्का देण्यात आला. ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे.

भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई:
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यामध्ये चौकशी करण्यात आली होती. त्याच्या अगोदर देखील या प्रकरणी ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपल्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे एकनाथ खडसे यांनी अनेकदा म्हटले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP Leader Eknath Khadse cancelled press conference Eknath Khadse Health Issue ED summons to Khadse news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x