6 May 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Health First | खजूर खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Health benefits of black dates

मुंबई, १२ जुलै | चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.

चांगल्या आरोग्यासाठी आणि सदृड शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते. खारीक खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो.

हाडांच्या आरोग्य सुधारणा:
खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते.

त्वचा उजळते:
खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. शिवाय, आपल्या आहार खारका असतील तर कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.

पचन प्रकिया चांगली राहते:
रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते. सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल. खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.

मज्जासंस्था मजबूत:
खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात. जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते. पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते. खजूर खल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.

निरोगी गर्भधारणासाठी:
खजूर तसेच खारीकमध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे त्याचा लाभ गर्भाला होतो. गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्रावाला प्रतिबंध होण्यास मदत होते. गरोदरपणी खजूर खल्ल्यास आईला चांगले दूध सुटते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण मिळण्यास मदत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of black dates in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x