5 May 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेची 10 लाखाची मदत | स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार - एकनाथ शिंदे

MPSC Exam

पुणे, १५ जुलै | MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांवर सर्वच बाजूनी संकट कोसळलं होतं. त्यानंतर आज शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचा धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी MPSC’चा कारभार पारदर्शक असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसंच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता पावसाळी अधिवेशात याबाबत चर्चा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: State Minister Eknath Shinde meet the family of Swapnil Lonakar in Pune news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x