6 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

येडियुरप्पा यांचा राजीनामा की त्यांना हटवलं? | मोदी-शहांना मर्जीतील डमी मुख्यमंत्री बसवायचा आहे? - सविस्तर वृत्त

B S Yediyurappa

बंगळुरू, २६ जुलै | कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री येडियुरप्पा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आतापर्यंत याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलं नव्हतं. परंतु, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.

यापूर्वी येडियुरप्पा 16 जुलैला दिल्लीला पोहोचले होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. अचानक झालेल्या बैठकीमुळे येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याविषयीच्या चर्चांना बळ मिळाले होते. यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

मोदी शहांची आधीच फिल्डिंग?
कर्नाटक भाजपवर येडियुरप्पा यांचं निर्विवाद वर्चस्व असल्याने मोदी-शहा यांना राजकीय अडचण होतं होती. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या विरोधात अचानक अंर्तगत गट निर्माण केले गेले. कर्नाटकातील वर येत असलेले नेते आणि जुने संघी बी एल संतोष यांची येदियुरप्पांविषयी अचानक नाराजी वाढू लागली. दुसऱ्या बाजूला येदियुरप्पांच्या कॅम्पमध्ये सक्रिय खासदार शोभा करंदलाजे यांची मोदी कॅबिनेमध्ये वर्णी लावण्यात आली.

येडियुरप्पा यांची लिंगायत समुदायावर मजबूत पकड:
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा लिंगायत समुदायावर मजबूत पकड आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे. गेल्या दिवशी लिंगायत समाजातील विविध मठातील 100 पेक्षा जास्त संतानी येडियुरप्पा यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला होता. त्यासोबतच त्यांना पदावर काढून टाकल्यास याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारादेखील या संतानी यावेळी दिला होता.

कर्नाटकातील 100 पेक्षा जास्त विधानसभा जागेवर लिंगायत समाजाचा प्रभाव:
कर्नाटक राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असून 17 टक्के आहे. राज्यातील 224 विधानसभा जागेतील 90 ते 100 जांगावर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त समुदायांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. यामुळे भाजपला मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे.

विरोधकांना देखील शंका:
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात भाजपाला फटका बसण्याची चर्चा सुरु. विरोधकांच्या मते मोदी-शहा कर्नाटकात त्यांच्या मर्जीतील डमी मुख्यमंत्री बसवू इच्छित असल्याने हा येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं सांगत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: B S Yediyurappa resigned politics in Karnataka news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Karnataka(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x