27 April 2024 10:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
x

धक्का! शिरोमणी अकाली दलाचा भाजपशी काडीमोड, स्वतंत्र निवडणूक लढणार

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला पंजाबमधील मित्र पक्ष शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी जोरदार धक्का दिला आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका शिरोमणी अकाली दल (एसएडी) स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या तेलगू देसमने तडकाफडकी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाने भाजपशी स्वतंत्र फारकत घेऊन स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय सुद्धा २०१९ पूर्वी भाजपसाठी मोठा धक्का समजण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या पंजाबमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी पिपरी नगरमधील धान्याच्या बाजारात एका जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित करताना ही घोषणा केली आहे. आमच्या पक्षाने पंजाबमधील जनतेला जे वचन दिले होते ते पूर्ण केले आणि आता हरयाणातील लोकांच्या कल्याणासाठी आमचा पक्ष काम करणार असल्याचे बादल यांनी स्पष्ट केले. तसेच हरयाणामध्ये नवा इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी अकाली दलाच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे थेट आवाहन सुद्धा बादल यांनी उपस्थितांना केले आहे.

तसेच आगामी निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीजपुरवठा देऊ अशी घोषणा केली. याआधी भाजपसोबत विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका लढवून सुद्धा त्यांच्या पदरात निराशाच आली होती. परंतु भाजपसाठी पंजाब खूपच अवघड झाल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x