3 May 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८; महिला पैलवान विनेश फोगाटला सुवर्ण पदक

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारतीय पैलवान उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहेत. काल पुरुष पैलवान बजरंग पुनियानं’ने सुवर्ण पदक पटकावून भारतासाठी सुवर्ण कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. तर आज महिला पैलवान विनेश फोगाटने सुवर्ण पदकावर नाव कोरल आहे.

महिला पैलवान विनेश फोगाटने ५० किलो फ्रीस्टाईल गटात जपानच्या युकी इरीला चितपट करून सुवर्ण पदकाची कमाई केली. विनेश फोगाटच एशियाड स्पर्धेतील दुसरं पदक आहे. २०१४ साली तिने इंचिऑन एशियाडमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती आणि आज सुवर्ण पदक मिळवलं आहे.

तसेच २०१४ साली आणि २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम सुद्धा विनेश फोगाटच्या नावावर आहे. एकूणच आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये भारतीय पैलवान उत्तम कामगिरी बजावताना दिसत आहेत.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x