11 May 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
x

राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंड्यावर तीव्र करणार | त्यांच्या मनात परप्रातीयांच्या प्रती घृणा-द्वेष नाही - चंद्रकांत पाटील

Raj Thackeray

मुंबई, ०६ ऑगस्ट | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो. या भेटीत परप्रांतीयांच्या भूमिकाबाबत चर्चा झाली. राज यांनी क्लिप दाखवली. युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसदर्भात चर्चा झाली.

माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून दोन भूमिका कोणाच्याही असतात. मोठ्या भूमिकेत येण्यासाठी, महाराष्ट्राचा नेता होण्यासाठी त्यांनी व्यापक भूमिका घेणं गरजेचं आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मनसे आणि भाजप एकत्र येण्याचा प्रस्ताव नाहीच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, यासोबतच युतीबाबत प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. त्यांच्या मनात परप्रांतीयांबाबत कोणतीच कटूता नाही. मात्र, ते त्यांच्या व्यवहारात प्रकट व्हावी. माझी भूमिका ही स्थानिकांना प्राधान्य द्या, अशाप्रकारे ते लोकांसमोर आणणं हे महत्त्वाचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

माध्यमांना काय माहिती दिली?
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर परप्रांतियांचा मुद्दा आणि हिंदुत्व या दोन विषयावर त्यांच्याशी चर्चा झाली. यावेळी राज यांनी कोविडच्या दीड वर्षात माझी भूमिका मी जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. आता कोविड कमी झाला. मी हिंदुत्वाची जी लाईन पकडली होती ती अधिक तेज करेल, पण अन्य प्रांतियांच्याबाबत माझ्या मनात घृणा आणि द्वेष नाही, असं राज यांनी सांगितल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे हे परप्रांतियांच्ंया विरोधात असल्याचं चित्रं आहे. हे चित्रं त्यांनी बदललं पाहिजे. त्यांनी भूमिका व्यापक करत नाही, तोपर्यंत थोडी मर्यादा राहील. त्यांनी भूमिका सांगितली. आता ती व्यवहारात आणली पाहिजे. ते तेवढं शक्य नाही. त्यांच्या मनात कुणाबद्दल कटुता नाही याबाबत मी कन्व्हिन्स झालो आहे. पण याचा निष्कर्ष असा नाही की उद्याच निवडणुकीवर चर्चा होईल आणि जागा वाटप होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MNS Chief Raj Thackeray will aggressive on Hindutva issue says Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x