12 May 2024 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

भाजपच्या आक्षेपानंतर ट्विटरची कारवाई | राहुल गांधींचे दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील ट्विट हटवले

Rahul Gandhi

मुंबई, ०७ ऑगस्ट | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी ट्विटरने कारवाई केली. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख समोर येत असल्याने ट्विटरने हे फोटो हटवले आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) या ट्विटबाबत दिल्ली पोलिस आणि ट्विटरकडे तक्रार केली होती. एनसीपीसीआरने पीडितेच्या कुटुंबाचे फोटो पोस्ट केल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यामुळे बाल न्याय कायदा आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

पीडितेला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहू:
दिल्लीतील कँट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी बुधवारी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर ते म्हणाले की, कुटुंबाला दुसरे काही हवे नसून फक्त न्याय हवा आहे. सध्याच्या परिस्थितीत पीडित कुटुंबाला मदतीची गरज आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी उभे राहू असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
दिल्लीतील जुणे नांगल गावात एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथील भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुनील आणि सविता (नाव बदलले आहे) यांच्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केले. त्यानंतर आरोपीने 1 ऑगस्ट रोजी पीडीत मुलीची हत्या करत तीला जाळले होते. या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली असून मुलीला न्याय मिळवण्यासाठी लोक आंदोलन करत आहे. सदरील घटनेत पोलिसांनी आतापर्यंत पुजारीसह 4 जणांविरोधात बलात्कार, खून आणि धमकी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, पॉक्सो कायदा आणि एससी-एसटी कायद्यांतर्गतही आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी आरोपींनी घातलेल्या कपड्यांपासून डीएनएचे नमुने घेण्यात आले आहेत. परंतु, मृतदेहाचे फक्त जळलेले अवशेष असल्याने कोणतेही ठोस निष्कर्ष काढता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास सुरु आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Twitter action against Rahul Gandhi’s tweet on Delhi rape case news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x