12 May 2024 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

राणेंना दादर, माहीमच काय कोकणातही जिंकू देणार नाही - आ. सदा सरवणकर

MLA Sada Sarvankar

मुंबई, १३ ऑगस्ट | शिवसेनेचे खासदार सदा सरवणकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे. दादर, माहीम परिसरात कार्यालय उघडणाऱ्या भाजप आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर कडाडले आहेत. त्यांना कितीही दुकाने उघडू द्या. त्यांना दादर, माहीमच काय कोकणातही जिंकू देणार नाही, असा दावाच सदा सरवणकर यांनी केला आहे.

दादर-माहीम मतदारसंघाचे शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या हस्ते माहीम इथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी हा इशारा देण्यात आला. भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही. भाजप आणि नितेश राणे यांनी अशी अनेक दुकाने उघडली आहे. त्यांनी कितीही दुकाने उघडू द्या. नितेश राणेंना आम्ही त्यांच्या कोकणातल्या मतदार संघात ही जिंकू देणार नाही, असा इशारा सरवणकर यांनी दिला आहे.

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही:
नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते माहीममध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Sada Sarvankar target to MLA Nilesh Rane news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x