6 May 2024 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Health First । पाय आणि छातीत दुखतंय ? । असू शकतो ‘हा’ जीवघेणा आजार - नक्की वाचा

Health First

मुंबई, १७ ऑगस्ट | जर पाय आणि छातीत एकाच वेळी दुखत असेल तर वेळीच काळजी घ्यायला हवी. तसं तर ही स्थिती सहसा उद्भवत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का पायांच दुखणं आणि हृदयाचं आरोग्य यांचा घनिष्ट संबंध असतो. जर एखाद्याला असा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

जर पायांच्या नसा दुखत असतील तर या स्थितीला पेरीफेरल आर्टरी डीजीज म्हणतात. त्या ठिकाणी अतिरीक्त चरबी जमा झालेली असते तेव्हा हा आजार होतो. 2014 मधील एका रिसर्चनुसार, पेरीफेरल आर्टरी डीजीज असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या जास्त होती. जर तुम्हाला हा आजार झाला किंवा पायांच्या नसा जर दुखत असतील तर याचा परिणाम तुमच्या झोपेवरही होतो.

काय आहेत लक्षणं ?
* मांड्या, मागचा भाग दुखणं
* काखेत दुखणं
* स्नायू दुखणं
* नखं खराब होणं
* इरेक्टाईल डिस्फंक्शन
* पायांच्या खालचा भाग तापमान वाढून दुखणं
* पायांच्या बोटावर जखम होणं

कोणत्या लोकांना होऊ शकतो पेरीफेरल आर्टरी डिजीज ?
* 50 वर्षांपेक्षा कमी वय आणि डायबिटीज असलेल्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
* एथेरोस्क्लेरोसिस आणि लठ्ठपणाचे शिकार असणाऱ्या लोकांना हा आजारा होऊ शकतो.
* धूम्रपान करणाऱ्या लोकांना हा आजार होऊ शकतो.
* कार्डियाक सर्जरीनंतर हा आजार होण्याची शक्यता असते.

कशामुळं वाढत जातो पेरीफेरल धमनी रोग ?
पेरीफेरल धमनी रोग हा एथेरोस्क्लेरोसिस मुळं वाढत जातो. एथेरोस्क्लेरोसिस मध्ये शरीरातील नसांच्या भिंतीवर चरबी जमा झालेली असते. यामुळं शरीरात होणारा रक्त प्रवाह कमी होत असतो. याचा परिणाम पायांवर सर्वात आधी दिसून येतो. यात रक्तवाहिन्यांना सूज येणं, शरीरावर जखमा होणं असा त्रास होतो. लिगामेंट्स किंवा स्नायूंमध्ये असामान्य रचना असेल तर हा त्रास जास्त होण्याचा धोका असतो.

कशी होते या आजाराची सुरुवात ?
जखमेपासून या आजाराची सुरुवात होते. जर तुमच्या पायांमध्ये जखम झालेली असेल आणि ही जखम लवकर बरी होत नसेल तर इस्किमिया होऊन ही जखम संपूर्ण शरीराला प्रभावित करत असते. याचा मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. यामुळं रक्तवाहिन्यांमध्ये इंफेक्शन होऊन शरीरातील रक्ताभिसरण थांबू सुद्धा शकतं. तरीही काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही या आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता.

बचावासाठी काय काळजी घ्यावी ?
१. धूम्रपान करत असाल तर हळूहळू ही सवय बंद करा.
२. डायबिटीज असेल तर साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवा
३. नियमित व्यायाम करा
४. 35-40 मिनिट चालण्याचा प्रयत्न करा.
५. ज्या पदार्थांमध्ये फॅट्सचं प्रमाण कमी असतं अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How chest pain and leg pain may connected with heart disease news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x